Monday, October 5, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन


पुणे: पेट्रोल-डिझेलसोबतच स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरात सुरू असलेल्या वाढीमूळ सर्वसामान्य माणूस मेटाकुटीस आला आहे. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका संपल्यापासून इंधन दरवाढ सुरु आहे. राज्यात पेट्रोल प्रति लिटर १११ रुपये तर डिझेल ९५ रुपये झाले आहे. याचबरबरोबर घरगुती वापराच्या विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत देखील ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. गॅस सिलिंडरची किंमत ९५० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या विरोधात पुण्यात बालगंधर्व चौकात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले.

या आंदोलनाच्या वेळी केंद्र सरकारने महागाई वाढल्याचा निषेध करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर अध्यक्ष मृणाल वाणी, विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ, रोहन पायगुडे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशांत जगताप म्हणाले, २०१४ साली महागाई,बेरोजगारी,भ्रष्टाचार अशा अनेक मुद्द्यांचे भांडवल करत भारतीय जनता पार्टी सत्तेत आली. सत्तेत आल्यानंतर मात्र ज्या सर्वसामान्य भारतीयांनी भारतीय जनता पार्टीला सत्तेत बसवले, त्या सर्वसामान्य जनतेचा मात्र भाजपला विसर पडला.त्यावेळेस ३००/- रुपयांना मिळणारा सिलेंडर आज तब्बल १०००/- रुपयांवर गेला आहे. पेट्रोल,डिझेल यांच्या दराने शंभरी पार केली आहे. तरीसुद्धा सातत्याने दररोज हे दर वाढवून सर्वसामान्यांची सामान्यांची लुटमार ही सुरूच आहे. निवडणुका आल्या की दर स्थिर ठेवायचे, निवडणुका गेल्या पुन्हा सर्व सामान्यांच्या खिशावर दरोडा टाकायचा, हीच खरी भाजपची नीती आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी आता भाजपला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. इथून पुढच्या काळात येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजपच्या उमेदवारास पराभूत करत महागाई विरोधातला हा राग आपण व्यक्त करावा” असे आवाहन मी या आंदोलनातून करत आहे. असे प्रशांत जगताप म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading