Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

महापालिकेत आजपासून ‘प्रशासक’राज

पुणे : महानगरपालिकेचा कालावधी काल संपंला आहे. काल रात्री पासून महापालिकेत प्रशासक राजवट आहे. नगरसेवकांचा पाच वर्षाचा कालावधी संपल्याने ते यापुढे नगरसेवकच राहणार नाहीत.
महापालिकेचा कार्यकाळ संपत आला असतानाही महापालिकेच्या निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नाहीत. त्यामुळे पुणे महापालिकेवर प्रशासक निर्णयासाठी राज्य सरकारने 3 फेब्रुवारी रोजी पत्र पाठवले होते. त्यानुसार महापालिका आयुक्तांनाच प्रशासक म्हणून नेमण्यात आले आहे.
महापालिकेचा कार्यकाळ संपत आला असतानाही महापालिकेच्या निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नाहीत.

कार्यकाळ संपल्याने महापालिकेच्या सर्व कार्यकारिणी रविवारी बरखास्त झाल्या.त्यामुळेउद्या पासून  प्रशासक या नात्याने आयुक्त सर्व निर्णय घेतील. नगरसेवक व पदाधिकारी यांना असलेल्या सर्व सोयी सुविधा संपुष्टात येणार आहेत. यामध्ये महापौर पासून ते सर्व नगरसेवक पदावरून पायउतार होतील.
दरम्यान महापालिकेवर प्रशासक राज्य आल्यानंतर क्षेत्रीय कार्यालय आंकडे कामाचे विभाजन केले जाऊ शकते. स्थानिक पातळीवर अडचणी यापूर्वी नगरसेवकांकडे यायच्या त्या आता प्रशासनाला पहावे लागणार आहे. सर्वसामान्य नागरिकांची कामे करताना आता नगरसेवकांचा कोणताही संबंध राहणार नाही. सर्वसामान्य नागरिकांना आता आपल्या अडचणी थेट प्रशासनाकडे मांडता येणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading