fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

ऑटोरिक्षा मीटर पुनः प्रमाणीकरणासाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ 

पुणे : प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती यांनी ऑटोरिक्षा चालकांनी गैरसोय टाळण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीटर पुन:प्रमाणीकरण (कॅलिब्रेशन) करण्याकरीता 31 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली असून या मुदतीत सर्व ऑटोरिक्षा चालक, मालकांनी ऑटोरिक्षांचे मीटर पुनः प्रमाणीकरण व मीटर तपासणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

मीटर तपासणीचे कामकाज फुलेनगर, आळंदी रस्ता चाचणी मैदान या ठिकाणी सुरु आहे. ऑटोरिक्षाधारक मीटर पुन:प्रमाणीकरण करुन न घेतल्यास त्यांच्यावर मुदत समाप्तीनंतर किमान 7 दिवस आणि कमाल 40 दिवस या मर्यादेत प्रत्येक दिवसाच्या विलंबासाठी 1 दिवस परवाना निलंबन केले जाईल. निलंबनाऐवजी तडजोड शुल्क जमा करण्यात इच्छुक ऑटोरिक्षाधारकांकडून प्रत्येक दिवसासाठी 50 रुपये आकारण्यात येईल जे किमान 500 रुपये आणि कमाल 2 हजार रुपये या मर्यादेत राहील, असे प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा पुण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी कळवले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading