fbpx
Sunday, May 19, 2024
BusinessLatest News

घरीच बनवा बाहेर सारखा रुचकर वडापाव

महाराष्ट्रातील एक आवडता पदार्थ म्हणजे ‘वडापाव’. पण हा वडापाव घरी बनवताना त्याची चव बाहेरच्या वडापाव सारखी येत नाही, अशी तक्रार गृहिणी करत असताता. म्हणून सुप्रसिद्ध लोकप्रिय फूड क्रिएटर गीता हंसरिया यांनी मोज किचन मिनिस्टर्स ऑफ इंडिया मोहिमेचा एक भाग म्हणून गृहिणींसाठी वडापावची पाककृती पुढे मांडली आहे, ज्यामुळे घरी बनवलेले वडापाव ही रुचिकार होती.

वडापावची पाकृती पुढीलप्रमाणे:- प्रथम बटाटे उकडून बारीक कुस्करून घ्या. त्यानंतर आले, भरपूर लसूण आणि हिरवी मिरची साधारणपणे ठेचून घ्या. गॅसवर थोडे तेल गरम करून मोहरीला फोडणी घ्या. त्यात हिंग, कढीपत्ता, ठेचलेले आले लसूण आणि मिरच्या घाला. थोडी कोथिंबीर घाला. परतल्यावर हळद आणि आवडीनुसार लाल तिखट घाला. नंतर बटाटे आणि मीठ घाला व एकजीव करा नंतर करून गोळे बनवा. आता वडे तळण्यासाठी तेल गरम करा. बेसन किंवा चणेडाळ घ्या व त्यामध्ये मीठ, हळद, लाल तिखट, हिंग आणि बेकिंग सोडा चिमूटभर घाला. पाणी घालून लेप सुसंगततेचे पीठ बनवा. एक चमचा गरम तेल घालून ते मिक्स करा. बटाट्याच्या मिश्रणाचा प्रत्येक गोळा घ्या आणि पिठात बुडवा आणि सोनेरी होईपर्यंत तळा. तयार झालेले वडे हे पाव आणि तळलेल्या हिरव्या मिरच्या आणि लसूण चटणी बरोबर सर्व्ह करा.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading