Friday, May 29, 2026
Latest NewsPUNETECHNOLOGY

आज पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 199 नवीन रुग्ण

पुणे :  पुणे शहरामध्ये कोरोनाच्या  रुग्ण संख्या कमी होत आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 199 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 333 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 65 लाख 94 हजार 65 इतकी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 6 लाख 4 81 हजार 80 रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 3 तर हद्दीबाहेरील 1 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9338 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे शहरामध्ये सध्या 1 हजार 947अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 108 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 3140-स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली  आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading