Friday, June 5, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

पुण्यातील तरुणाची सातारा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या

सातारा : पुण्यातील बिबवेवाडी परिसरात राहणाऱ्या एका तरुणाची सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ही घटना काल सायंकाळी घडली. संजय पाटोळे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शिरवळ येथील नीरा नदी काठावरील एका अपार्टमेंटच्या टेरेसवर या तरुणावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. लेक पॅलेस असे अपार्टमेंटचे नाव असून या सोसायटीच्या तीन विंगचे टेरेस वर हा तरूण रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच शिरवळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना या तरुणाच्या खिशात सापडलेल्या आधार कार्ड वरून तरुण पुण्यातील बिबेवाडी येथील राहणारा असून त्याचे पूर्ण नाव संजय सुभाष पाटोळे असल्याचे समजले. खूनाचे नेमके कारण अद्याप निष्पन्न झाले नाही. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिरवळ पोलिस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading