पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे नवीन 448 रुग्ण
पुणे : पुणे शहरामध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्या कमी होत आहे. मागील काही दिवसांपासून शहरात नवीन रुग्णांची संख्या पाचशेच्या आत आढळून येत आहे. शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ कमी होत आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 448 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
तर 867 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत संख्या 6 लाख 58 हजार 326 इतकी झाली आहे .यापैकी 6 लाख 45 हजार 964रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 3रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 0 तर हद्दीबाहेरील 3 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 333 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.पुणे शहरामध्ये सध्या 3हजार 029अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 145 रुग्ण गंभीर आहेत.आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 4678स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
