कोरोनामध्ये ना मुलगा जवळ जातो ना मुलगी; त्यावेळी सावित्रीबाई फुलेंनी कस केल असेल – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
पुणे : महापुरुषाचे चरित्र वाचले पाहिजे. त्यातून प्रेरणा मिळत असते. आज कोरोनामध्ये ना मुलगा जवळ जातो ना मुलगी ना पत्नी. मात्र त्यावेळी प्लेगच्या साथीत सावित्रीबाई फुले यांनी कस केल असेल? सावित्रीबाई फुले यांनी जे विचार जगासमोर मांडले आहेत ते आपल्याला पुढे घेऊन गेले पाहिजेत, असे मत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केले.
आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अन्नपुरवठा मंत्री मंत्री छगन भुजबळ, शिवसेनेचे नेते व विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे , महापौर मुरलीधर मोहोळ उपमहापौर सुनिता वाडेकर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले,ज्यांचे पुतळे उभारतोय मात्र त्यांच्याकडून काहीच घ्यायचं नाही का? विद्यापीठावर आता नैतिकितेच ओझं आलं आहे. कुठेही गेले तरी पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी आहोत याचा अभिमान वाटला पाहिजे. विद्यापीठाला साजेशा असलेला अभ्यासक्रम असला पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, सावित्रीबाई फुले यांनी महाराष्ट्राचे वैचारिक पुढारलेपण केले. देशात प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करण्याची पहिली मागणी त्यांनीच केली. आज शिक्षणाच्या माध्यमातून सर्व क्षेत्रात महिला सक्षमपणे वाटचाल करत आहेत. याचे श्रेय सावित्रीबाई फुले यांना जाते. भारतीय समाज नेहमी त्यांचा आभारी राहील. महाराष्ट्राचे वैचारिक पुढारलेपण ज्या थोर महापुरुषांमुळे आहे, त्यात सावित्रीबाईंचा उल्लेख आवर्जुन करावा लागतो. संस्कारयुक्त शिक्षण आले की न्याय आणि सत्य येते. आजकाल नवीन शिकण्याची इच्छा नसते. अन्यायाविरुद्ध दाद मागण्याची पाळी आली तर थांबू नये. सावित्रीबाईंनी अपमान, अवहेलना सोसूनही शांतपणे संघर्ष केला. त्यांच्यामुळे अनेकांच्या जीवनात आनंद आला.
छगन भुजबळ म्हणाले, आजचा दिवस ऐतिहासिक आहे. मात्र, कॉंग्रेसचे नेते केशवराव जेधे यांनी पुणे महापालिकेत महात्मा फुले यांचा पुतळा उभारण्याची मागणी १९२५ साली केली होती त्यांना अनेकांनी विरोध केला. अनेक प्रयत्नांनंतर १९६९ साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते पुणे महापालिकेतील पुतळ्याचे अनावरण झाले.
