CBSE बोर्डाच्या पुणे शहरातील बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू करण्यात येणार महापौरांनी दिले सावित्री सन्मान फाउंडेशन ला आश्वासन
पुणे: विद्येचे माहेरघर असलेल्या आपल्या पुण्यामध्ये खाजगी शाळांच्या सततच्या मनमानी आणि अरेरावी कारभाराला कंटाळून तसेच कोरोना सारख्या महामारीच्या संकटातही या सर्व खाजगी शाळांनी ज्याप्रकारे पालक व विद्यार्थ्यांना शैक्षणिक अवाजवी फीसाठी वेठीस धरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले आहे व पालकांना नाहक मानसिक त्रास दिला आहे या सर्व गोष्टींना कंटाळून आमदार योगेश आण्णा टिळेकर(प्रदेशाध्यक्ष :भाजपा OBC मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश )आणि सावित्री सन्मान फाउंडेशन च्या वतीने पुणे महानगरपालिका आयुक्त (शिक्षण विभाग)व मुरलीधर मोहोळ, पुणे महानगरपालिका महापौर) यांना निवेदन देऊन पुण्यामध्ये CBSE बोर्डाच्या पुणे महानगरपालिकेच्या शाळा सुरु करणे किती गरजेचे आहे यासंदर्भात चर्चा केली.
या विषयासाठी माजी आमदार योगेश टिळेकर व सावित्री सन्मान फाउंडेशन च्या वतीने सोनल कोद्रे यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांना निवेदन देण्यात आले व त्यांनी या निवेदनाचा सकारात्मक विचार करून व शिक्षण क्षेत्रातील परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून या विषयावर काम सुरू केले आहे.मुंबई च्या धर्तीवर पुण्यामध्येही Cbse बोर्डच्या पुणे महानगरपालिकेच्या पुणे पब्लिक स्कूल लवकरच सुरु करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे.आणि त्या दृष्टीने पुणे महानगरपालिकेने कामही सुरु केलेले आहे.
अशी माहिती सन्मान फौंडेशन च्या संस्थापिका सचिव सोनल निकीत कोद्रे,यांनी दिली.
