Friday, June 5, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

हेल्थ केअर लाईफलाईन या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी पुणे महापालिकेला करणार – किरीट सोमय्या

पुणे: मागील आठवड्यात किरीट सोमय्या  यांच्यासोबत पुणे महानगरपालिका धक्काबुक्की झाली होती.
त्यानंतर यावरून मोठे राजकारण रंगलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी काही शिवसैनिकांना अटक केली होती. दरम्यान किरीट सोमय्या यांना पुणे महानगरपालिकेच्या ज्या पायऱ्यावर रोखण्यात आलं होतं त्याच पायऱ्यावर आज त्यांचा पुणे शहर भाजपच्या वतीने सत्कार केला जाणार आहे.त्यासाठी किरीट सोमय्या आज  परत पुणे दौऱ्यावर आले आहेत.त्यानी पुण्यात आले असता पत्रकाराशी संवाद साधला

किरीट सोमय्या आज पुणे दौऱ्यावर आले आहेत.
किरीट सोमय्या म्हणाले, कोविड सेंटर प्रकरणात उद्धव ठाकरेंनी ज्या कंपनीला ब्लॅक लिस्ट केले त्याविरोधात पुणे पोलिसांनी, पुणे महापालिकेनी तसेच पीएमआरडीए ने कारवाई का केली नाही? असा सवाल करत हेल्थ केअर लाईफलाईन या कंपनीने लोकांचा जीव घेतला. त्यामुळे मी आज पुन्हा हेल्थ केअर लाईफलाईन या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी पुणे महापालिकेला करणार असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले.
स्वतः उद्धव ठाकरे यांनी त्यांना ब्लॅक लिस्ट केले. रीतसर त्या कंपनीमुळे लोकांचे जीव गेल्याचे रिपोर्ट मध्ये आले आहे. तरी या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलाच कसा? त्यामुळे उद्धव ठाकरेंना लोकांच्या जीवाशी खेळण्याचा कॉन्ट्रॅक्ट राज्यातील जनतेनी दिला आहे का? उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांच्या मदतीने कोविड घोटाळा केला आहे त्यामुळे कारवाई व्हायलाच हवी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.
तसेच गेल्यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाने १०० गुंड पाठवले होते, त्यावेळी कारवाई होऊ दिली नाही. बघतो कशी कारवाई करत नाही, असा इशाराही सोमय्यांनी दिला आहे. तसेच संजय राऊतला जाब द्यावाच लागणार. असेही ते म्हणाले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading