Tuesday, June 23, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

किरीट सोमय्या हल्ला प्रकरण : शिवसैनिकांना जामीन मंजूर

पुणे : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर पुण्यात हल्ला करण्याचा प्रयत्न करणारे शिवसेना कार्यकर्ते आज स्वतःहून शिवाजीनगर पोलिसांसमोर हजर झाले. यामध्ये पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांसह अनेक कार्यकर्त्यांचा सहभाग होता. त्यांना आज न्यायालयात हजार केले असता जामीन मंजूर करण्यात आला आहे.

तीन दिवसांपूर्वी किरीट सोमय्या हे जम्बो कोविड सेंटरमध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार देण्यासाठी पुण्यात आले होते. त्यावेळी पुणे महापालिकेत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमय्या यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठ्या संख्येने पालिकेत शिवसैनिक जमले होते. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीसठाण्यात शिवसेनेच्या 60 जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आज शिवसेना कार्यकर्ते स्वतःहून पोलीसठाण्यात हजार झाले. त्यानंतर शिवसैनिकांच्या अटकेच्या कारवाईला सुरुवात झाली आहे. यामध्ये पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांसह अनेक कार्यकर्त्यांचा सहभाग होता. त्यांना दुपारी न्यायालयात हजर केले असता पुणे जिल्हा सत्र न्यायालयाकडून 3000 रुपयाच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading