Saturday, July 18, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

‘लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्व्हिसेस’ कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – किरीट सोमय्या

पुणे : पुण्याच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाला असा, आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. यांनी आज पुणे दौऱ्यावर असताना परत त्या जम्बो कोविंड सेंटर बदल भाष्य केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील PMRDA ने हे कंत्राट भ्रष्ट मार्गाने लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीला दिले होते. सुजित पाटकर हे या कंपनीचे मालक आहेत. जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये पत्रकार पांडुरंग रायकर यांच्यासह 3 जणांचे मृत्यू झाले. त्याला लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्व्हिसेस ही कंपनी आणि सरकार जबाबदार आहे. त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपचे नेते व खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.

आज पुण्यात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. आज सोमय्या यांनी या संदर्भात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

किरीट सोमय्या म्हणाले, सेंटरच्या कामासाठी आवश्यक असलेल्या पात्रतेकडे दुर्लक्ष करण्यात आलं असल्यामुळे रूग्णांचे मृत्यू झाले. लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्विसेस सुजित पाटकर यांची कंपनी आहे. याप्रकरणी सरकार तसेच संबंधित यंत्रणांकडून कामात कसूर झाल्याचे दिसत आहे. सुजित पाटकर आणि PMRDA चे मुख्याधिकारी यांना तत्काळ अटक करण्यात यावे. याबरोबरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

अजित पवार यांना पुरावे पाहिजे होते, त्यासाठी पुरावे आणले आहेत. अजित पवार यांच्या निगराणीत हे कंत्राट दिले गेले आहे. त्यामुळे त्यांनीही याबाबत स्पष्टीकरण द्यावे. शिवसेनेच्या माफियांसाठी पैशांची उधळपट्टी सुरू आहे. ते लोकांचे जीव वाचवू शकले नाहीत, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केले आहेत. लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे मालक सुजित पाटकर हे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुलींच्या कंपनीत भागीदार आहेत. काळ्या यादीत टाकलेल्या या कंपनीला जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट देण्यात आलं, असाही आरोप सोमय्या यांनी यावेळी केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading