महिला आयोगाशी संबंधित कामांसाठी रूपाली चाकणकर उद्या पुण्यात
पुणे :महिला सबलीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र हे नेहमीच अग्रगण्य राज्य राहिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण असो की राज्य महिला आयोगाची स्थापना असो, महाराष्ट्र राज्य हे देशासाठी दिशादर्शक ठरले आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या प्रयत्नांतून आता या दिशेने पुढचे पाऊल टाकले जात आहे. राज्यातील सर्व महिलांना महिला आयोगाशी संबंधित कामांसाठी मुंबईला यावं लागू नये यासाठी आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वतः उद्या शनिवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२२ पासून दर शनिवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेस भवन, पुणे येथे उपस्थित असणार आहेत. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.
राज्य महिला आयोगाशी संबंधित कामांसाठी मुंबईला न जाता पुण्यातच ही कामे मार्गी लागणार असल्याने महिला भगिनींकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे.
