Tuesday, September 15, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

भीमा कोरेगाव दंगल : विश्वास नांगरे पाटील यांना चौकशीसाठी बोलावणार – आशिष सातपुते


पुणे:कोरेगाव-भीमा येथील दंगल प्रकरणी पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला चौकशीसाठी कोरेगाव भीमा चौकशी आयोगा समोर हजर झाल्या आहेत.
दरम्यान कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर रश्मी शुक्ला यांची चौकशी सुरू झाली असल्याची माहिती समोर येत आहे. २०१८ मध्ये झालेल्या दंगलीत झालेल्या हिंसाचारानंतर राज्य सरकारने याप्रकरणी माजी न्यायाधीश जे . एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती.
दरम्यान, २०१८ मध्ये झालेल्या दंगलीत झालेल्या हिंसाचारानंतर राज्य सरकारने या प्रकरणी कोलकाता हायकोर्टाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या नेतृत्वाखालील चौकशी आयोग नेमला आहे. या आयोगाकडून सध्या शुक्ला यांची साक्ष नोंदवली जात आहे. दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनाही समन्स बजावण्यात आले होते, परंतू ते हजर झाले नाहीत. त्यावेळी सिंग हे अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) या पदावर होते. शुक्ला यांनी मात्र आयोगासमोर हजेरी लावली. तसेच शपथपत्र दाखल करण्यासाठी वेळ मागितला. या कार्यक्रमाबाबत पुणे पोलिसांकडून काही कागदपत्रे मिळणे बाकी असल्याचं यावेळी त्यांनी आयोगापुढं सांगितलं होतं.आज त्याची परत सुनावणी झाल्या नंतर कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे वकील ऍड आशिष सातपुते म्हणाले,1जानेवारी 2018 ला जयस्तंभ जवळ असलेल्या कोरेगाव-भीमा याठिकाणी दोन समुहात झाली होती दंगल. त्यावेळेस कोल्हापूर परिक्षेत्राच्या नांगरे पाटील होते कार्यरत.नांगरे पाटलांना चौकशी कामी साक्ष नोंदवण्यासाठी आयोगासमोर बोलवण्यासाठी आयोगासमोर अर्ज केलाय दाखल.भीमा कोरेगाव दंगली प्रकरणात मुंबईचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना चौकशीसाठी कोरेगाव-भीमा आयोग बोलवणार आहे. अशी माहिती वकील आशिष सातपुते यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading