Saturday, October 31, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

आज दिवसभरात पुणे शहरात 2 हजार 141 नवीन कोरोना रुग्ण

पुणे: शहरात मागील आठवड्यापासून कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येचा आलेख खाली उतरत चालला आहे. शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 2 हजार 141नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4136रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 64लाख64हजार 82इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 6लाख 15हजार 186इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 15
रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील तर 9पुणे महापालिका हद्दीबाहेरील6रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9270जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरामध्ये सध्या 22026रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 288रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 10536स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली  आहे.

Leave a Reply