Saturday, October 31, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

अपहरण झालेल्या चिमूकल्याचा अवघ्या तीन तासात शोध; पुणे पोलिसांची कामगिरी  

पुणे : बिबवेवाडी परिसरातून काल (दि. 2)  रात्री सव्वा सातच्या सुमारास एका ५ वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण करण्यात आले होत. बिबवेवाडी परिसरातील लकडे बईची चाळ येथे हा प्रकार घडला. पण पुणे पोलिसांनी मुलाच्या आईला आधार देत अवघ्या तीन तासात सापळा रचून अतिशय शिताफीने आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली. अन् माय – लेकराची भेट झाली. स्वप्नील रमेश शिंदे असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्योती धनराज साळुंखे ह्या सिंगल मदर आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्या बिबेवाडीतील पवन नगर परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांची आरोपी स्वप्नील रमेश शिंदे याच्याशी जुनी ओळख आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या वादातून आरोपी स्वप्नील याने ज्योती यांचा मुलगा नीरजच अपहरण केले. तसेच त्याला ठार करण्याचा स्वप्नीलचा प्लॅन होता. मात्र त्याचा हा प्लॅन फसला. त्यापूर्वीच पोलिसांनी त्याला अटक केली.

दरम्यान, पुणे पोलिसांनी आरोपीला अटक केले असून आज त्याला न्यायालयात हजार करण्यात आले. त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Leave a Reply