Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

TET परीक्षा गैरव्यवहार : तब्बल ७ हजार ८०० नापास परीक्षार्थींना पैसे घेवून केले पास 

पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती 

पुणे : २०१९-२0ला झालेल्या शिक्षण पात्रता परीक्षेमध्ये (TET) अपात्र ठरलेल्या तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थीना नापास असूनही पास केल्याची धक्कादायक माहिती पुणे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान, टीईटी परीक्षा गैरव्यवहारात आतापर्यंत पाच गुन्ह्यात तब्बल ४० जणांना अटक करण्यात आलीय.

२०१९ -२० ला टीईटी पेपर १च्या परीक्षेला १ लाख ८८ हजार ६८८ जणांनी तर पेपर दोन साठी 1 लाख ५४ हजार ५९६ परीक्षा दिली होती. यातील जवळपास १६ हजार परीक्षार्थी पास करण्यात आले होते. मात्र टीईटी परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी या सर्व सर्टिफिकेटची पडताळणी केली.  यामध्ये तब्बल ७ हजार ८० जण नापास परीक्षार्थींना पास केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाची सर्व माहिती पुणे पोलीस आता महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद आणि राज्य सरकारला देणार आहे. त्याचबरोबर २०१८ मध्येही झालेल्या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर अपात्र परीक्षार्थीकडून पैसे घेतले असून त्याची पडताळणी सुरु असल्याचं पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तां यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading