fbpx
Saturday, April 27, 2024
BusinessLatest News

होंडातर्फे भारतात 2022 CBR650R लाँच, बुकिंग्ज सुरू!

नवी दिल्ली : मिडलवेट स्पोर्ट्स बाइक विभागातील भारतीय रायडिंग कम्युनिटीच्या उत्साहाला आणखी चालना देण्यासाठी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. कंपनीने आज नवी 2022 CBR650Rलाँच केली. हे नवे मॉडेल सीकेडी*च्या(कम्प्लीटली नॉक्ड डाउन) मार्गाने भारतीय बाजारपेठेत येणार असून होंडाच्या एक्सक्लुसिव्ह बिगविंग टॉपलाइन शोरूम्सच्या माध्यमातून तिचे बुकिंग करता येईल.

 

जबरदस्त कामगिरी आणि स्टाइल असलेली 2022 CBR650Rआपले वेगवान पिक-अप आणि दमदार टॉप एंड रेंजच्या मदतीने तरुण रायडर्सच्या उत्साहात आणखी भर घालते.

याप्रसंगी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अत्सुशी ओगाता म्हणाले, ‘CBR650R चे ताकदवान इंजिन आरआर मशिनसारखाच सळसळता उत्साह आणि स्पोर्टी कामगिरी अनुभवण्याची संधी देते, तर 2022 CBR650R मुळे ग्राहकांना मिलवेट मोटरसायकलवर रायडिंगचा खरा थरार अनुभवता येईल.’

नव्या 2022 इयर मॉडेल लाँचविषयी आपले विचार मांडत होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. च्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक श्री. यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘तरुण तसेच अनुभवी रायडर्ससाठी रायिंगचा थरार वाढवत CBR650R ने स्वतःला सिद्ध केले आहे. स्ट्राइप्सच्या रंगातला हलकासा बदल एयरोडायनॅमिक्स आणि CBR650R चे चमकदार रूप खुलवणारे ठरले आहेत.’

डिझाइन आणि स्टायलिंग

आरामदायीपणा व आकर्षक रूप यांचा योग्य मिलाफ साधणाऱ्या 2022 CBR650R मध्ये केशरी हायलाइट्स (मॅट गनपावडर ब्लॅक मेटॅलिक रंग) आणि नवे स्पोर्टी ग्राफिक्स(ग्रँड प्रिक्स लाल रंग) देण्यात आले आहे. नवे अप्पर आणि लोअर फेयरिंग, राकटपणा तसेच स्लिम लाइन्ससह देण्यात आले आहे, तर सीट युनिट मागच्या भागाला आटोपशीर लूक देते व पर्यायाने जास्त उपयुक्त ठरते.

ताकद आणि कामगिरी

६४९ सीसी, डीओएचसी १६- व्हॉल्व्ह इंजिन इन- लाइन फोर- सिलेंडर परफॉर्मन्स @ 12,000rpmला ६४ केडब्ल्यूची मॅक्स नेट पॉवर तयार करते व 8,500 rpmला ५७.५ एनएमचा मॅक्स टॉर्क डिलीव्हर करते.

रंग, किंमत आणि उपलब्धता

होंडाने आजपासून 2022 CBR650R चे बुकिंग आपल्या एक्सक्लुसिव्ह प्रीमियम डीलरशीप्सकडे खुले केले असून त्यात बिगविंग टॉपलाइन गुरुग्राम (हरियाणा), मुंबई (महाराष्ट्र), बेंगळुरू (कर्नाटक), इंदौर (मध्य प्रदेश), कोची (केरळ), हैद्राबाद (तेलंगणा) आणि चेन्नई (तमिळ नाडू)

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading