Sunday, October 25, 2026
Latest NewsPUNE

कालीचरण महाराजांना कडक शिक्षा व्हावी – राष्ट्रवादी कॉँग्रेस

पुणे : समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होईल असे भडकाऊ आणि चिथावणीखोर भाषणे केल्या प्रकरणी कालीचरण महाराजला  पुणे पोलिसांनी काल अटक केली आहे. आज त्यांच्या जामिनावर कोर्टात सुनावणी होणार होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कालीचरण महाराजांना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी करीत न्यायालयातच आंदोलन केले.

यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे, किशोर कांबळे व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, कालीचरण महाराजांना लवकरात लवकर कडक शिक्षा व्हावी,  ही आमची आज मागणी आहे. त्यांनी धार्मिक श्रध्दांचा अपमान करून समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होईल असे भडकाऊ आणि चिथावणीखोर भाषणे केली आहेत. याचा आम्ही आंदोलनातून निषेध करत आहोत, असे रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading