Monday, May 4, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

एसटी विलीनीकरणाच्या विषयावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार – उपमुख्यमंत्री

पुणे : मागच्या महिन्याच्या 28 तारखेपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यात परवा परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना पगार वाढ देण्याची घोषणा केली. तरी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मुंबई हायकोर्टात त्याबद्दल केस सुरू आहे. त्यावर 3 लोकांची समिती निर्णय घेईल त्यात एसटी विलगिकरणाचा निर्णय घेईल, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले आहे. एसटी विलीनीकरणाच्या विषयावर पुढच्या आठवड्यात मंत्री मंडळाच्या बैठकीत चर्चा होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांनी जसे एसटी कर्मचाऱ्यांचे विलगीकरण केले आहे. तसेच राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांचे विलगीकरण करेल. एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न लवकरात लवकर मिटवायला पाहिजेत.

भाजप रोज तीन वर्षे महाविकासआघाडी सरकारची फसवणूक या विषयावर रोज नवीन नेते पत्रकार परिषद घेत आहेत त्यावर अजित पवार म्हणाले, सरकार आलं त्या दिवसा पासून सरकार जाणार हे ऐकतोयं. पण सरकार चाललंय ना ? त्यांच्या सद्सद्विवेक बुद्धीला पटेल ते बोलतात, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

नागपूरमध्ये भाजपचे खासदार हे विधान परिषदेवर निवडून आले त्यावर अजित पवार म्हणाले ,अमरीश पटेल निवडणूक बिनविरोध होणार हे विधान पाहिल्यादा कुणाकडून आलं? टाळी एका हाताने वाजत नाही।
मुंबईत दोनच जण निवडून येणार, कोल्हापूर् मध्ये सतेज पाटील आणि जळगावात अमरीश पटेलच   निवडून येणार होते.
घोडेबाजार टाळण्यासाठी बिनविरोध वर एकमत झालं, अशी टीका त्यांनी भाजपवर केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading