भारतीय सैन्यदल, पोलीस, अग्निशमन दल व पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक शुल्कात ५० टक्के सवलत

न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटतर्फे घोषणा ; केजी ते पदव्युत्तर शिक्षणात सवलत लागू
 
पुणे : न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटच्या वतीने भारतीय सैन्य दल, पोलीस दल, अग्निशमन दल आणि पत्रकार यांच्या पाल्यांना शैक्षणिक शुल्कात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. केजी ते पदव्युत्तर शिक्षणात सर्वच इयत्तांमध्ये ही सवलत देण्यात येणार आहे. कोविड काळात आणि त्याव्यतिरीक्त देखील इतर काळात केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी इन्स्टिट्यूटच्या वतीने ही सवलत देण्यात येत आहे. इन्स्टिट्यूटला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देखील सर्व शाखांमध्ये ही सवलत देण्यात येत आहे, अशी माहिती जाधवर ग्रुप आफ इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांनी दिली.

प्लेग्रुप ते दहावीपर्यंत शाळा, आर्ट्स कॉमर्स सायन्स जुनियर कॉलेज, सिनियर कॉलेज, इंजिनियरिंग डिग्री डिप्लोमा कॉलेज, बी.एड अँड डी. एड कॉलेज, एमबीए मॅनेजमेंट कॉलेज, नर्सिंग आणि पॅरामेडिकल कॉलेज आदींच्या शाखेमध्ये ५०% सवलतीमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटचे मानाजी नगर न-हे धायरी येथे दोन आणि वडगाव बुद्रुक, आंबेगाव, भोर, उस्मानाबाद असे एकूण सहा कॅम्पस आहेत.

अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, भारतीय सैन्य दल, पोलीस दल, अग्निशमन दलातील अधिकारी-कर्मचारी आणि पत्रकार हे आपल्या कामाच्या माध्यमातून समाजसेवाच करीत असतात. देशाचे रक्षण करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे रक्षण करून त्यांना सुरक्षा पुरवण्याचे काम यांच्यामार्फत होत असते.  त्यामुळे त्यांच्या मुलांची शिक्षणाची जबाबदारी स्विकारत त्यांना सर्व प्रकारच्या शिक्षण ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. तसेच हॉस्टेल शुल्कात देखील ही सवलत देण्यात येणार आहे. तरी या सवलतीचा लाभ घेऊ इच्छिणा-यांनी ९०७५३४४२७६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: