प्राथमिक शाळा लवकरच सुरू होणार – आरोग्य मंत्री राजेश टोपे

मुंबई : राज्यात पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याबाबत चाईल्ड कोविड टास्क फोर्सने सहमती दर्शविली आहे. त्यामुळे लवकरच प्राथमिक शाळा सुरू करणार असल्याचे राज्य आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी स्पष्ट केले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या मान्यते नंतर या बाबत अधिकृत घोषणा केली जाईल असेही ते म्हणाले.

टोपे म्हणाले, काल (मंगळवारी) रात्री चाईल्ड कोविड टास्क फोर्सची बैठक झाली. यामध्ये तज्ञांनी शासनाने शाळा सुरु करण्याबाबत इतर बाबींची पूर्तता केल्यास शाळा सुरु करण्यास काहीच हरकत नसल्याचे मत नोंदवले आहे. त्यामुळे लवकरच पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा सुरु होणार आहोत. लहान मुलांसाठी लस जेव्हा उपलब्ध करून दिली जाईल, तेव्हा लहान मुलांचे लसीकरण सुरु होईल. मात्र त्यापूर्वी शाळा सुरु करण्यास हरकत नसल्याचंही टास्क फोर्समधील डॉक्टरांचं म्हणणं आहे. तरी कॅबिनेट बैठकीत सोबतच मुख्यमंत्र्यांसोबत शाळा सुरु करण्याचा निर्णय बाबत चर्चा केली जाणार आणि त्यानंतर राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.

टोपे म्हणाले –

  • लहान मुलांच्या लासिकरणांसाठी राज्य सरकारची तयारी
  • मुलांमध्ये कोरोना संक्रमण होत असले तरी त्यांचे प्रमाण कमी आहे.
  • महाराष्ट्रात डेल्टा शिवाय दूसरा कोणताही कोरोना व्हेरीयंट नाही.
  • राज्यात जवळपास 11 लाख डोसचे लसीकरण पूर्ण.
  • सध्य स्थिती कायम राहिल्यास नियमात शिथिलता मिळेल.
  • कोरोनाचा प्रभाव कमी असला तरी गाफील राहू नका
  • कोरोनाची तिसरी लाट आली तरी ती सौम्य स्वरूपाची असेल.

 

Leave a Reply

%d bloggers like this: