छोट्या उद्योजिका, बचतगट, एनजीओ यांच्या माध्यमातून निर्माण केलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी ई-मार्केटिंग पोर्टल स्थापित – उमा खापरे

पुणे:भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारसरणीनं प्रेरित होऊन छोट्या उद्योजिका,बचतगट,एनजीओ यांच्या माध्यमातून निर्माण केलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी ई-मार्केटिंग पोर्टल स्थापित करण्यात आले आहे.

या पोर्टल संदर्भात माहिती देण्यासाठी आज पुण्यात पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे,राष्ट्रीय महिला मोर्चा उपाध्यक्षा ज्योतिबेन पंड्या,पुणे शहर महिला आघाडी अध्यक्षा नगरसेविका अर्चना पाटील महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा वर्षा डहाळे पुणे शहर महिला आघाडी सरचिटणीस गायत्री भागवत उपस्थित होते.
या पोर्टलला गवरमेन्ट ई मार्केटिंग (जीईएम) असं नाव दिल असल्याची माहिती उमा खापरे यांनी दिली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष वनाथी श्रीनिवासन यांनी साडेसात लाख महिलांना जीईएम पोर्टलचे झोपण्याचे उद्दिष्ट ठेवले असून संपूर्ण भारतातील महिलांना नोंदणी द्वारे जोडण्यात येणार असून त्याची सुरुवात पुण्यातून करण्यासाठी भाजपा सर्वोच्च नेतृत्वानं आयोजन केले आहे असं देखील खापरे म्हणाल्या

Leave a Reply

%d bloggers like this: