मिलिंद खांदवे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिबीरात 201 जणांनी रक्तदान केले.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते मिलिंद खांदवे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान व महाआरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद दिला. या शिबीरात 201 जणांनी रक्तदान केले.320 जणांना चष्मे वाटप केले. तर, 450 जणांची आरोग्य तपासणी केली आहे.
पुणे शहरामध्ये रक्ताचा तुटवडा आहे. यामुळे  लोहगाव मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते मिलिंद खांदवे यांनी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर तसेच महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही समाजउपयोगी शिबिरांना लोहगाव व परिसरातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
लोहगाव मधील गाथा लॉन्स येथे आयोजित महाआरोग्य तपासणी शिबिरात अनुभवी डॉक्टरांच्या वतीने ब्लडप्रेशर, शुगर, वजन/उंची, डोळे तपासणी करण्यात आली.  यावेळी आमदार सुनील टिंगरे, सोनाली मारणे, अशोक खांदवे, नवनाथ मोझे, प्रितम खांदवे, विकास टिंगरे, नानासाहेब नलावडे, राजेंद्र खांदवे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: