पुणे महापालिकेतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांच्या मानधनाचा मार्ग मोकळा – आबा बागुल

पुणे : गेली अनेक वर्षे पुणे महानगरपालिकेतर्फे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महनीय व्यक्तींचा बुके व मोमेंडो देऊन सत्कार करण्यात येतो परंतु काही कारणांमुळे त्यांना मानधन देणे बंद करण्यात आले होते. हे मानधन सुरू होण्यासाठी पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल अनेक वर्षे पाठपुरावा करत होते. त्याबाबतचा ठराव त्यांनी महानगरपालिकेत दिला होता. तो मुख्यसभेने एक मताने मंजूर केला असून पुरस्काराबरोबरच मानधन देण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे आबा बागुल म्हणाले.

आबा बागुल म्हणाले की, आता पूर्वीप्रमाणे महापालिकेतर्फे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महनीय व्यक्तींना यथोचित पुरस्कार देता येणार असून पुरस्कारासाठी राखीव असणाऱ्या 5 लाख रुपायातून पुरस्कार्थीचा यथोचित सत्कार, मानधन 1,11,000/-, मोमेंडो व श्रीफळ असे स्वरूप असणार आहे. यामुळे नक्कीच पुरस्कार्थीना पुरस्कार मिळाल्यासारखे वाटेल असा विश्वास आबा बागुल यांनी शेवटी व्यक्त केला.

Leave a Reply

%d bloggers like this: