fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

एका दिवसात एका चित्रपटगृहात झिम्माचे १८ खेळ हाऊसफुल्ल!

— लॅाकडाऊननंतर चित्रपटगृहांमध्ये सुपरहिट ठरलेला पहिला मराठी चित्रपट —

प्रेक्षकांच्या प्रतिक्षेला विराम देत १९ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात ‘झिम्मा’ प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून त्याचे सर्व शोज हाऊसफुल्ल जात आहेत. विकएंडला संपूर्ण महाराष्ट्रात सर्व चित्रपटगृहांबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लागले होते तर ‘झिम्मा’चे प्री बुकिंगही जोरदार सुरु आहे. विशेष म्हणजे विकएंडला ठाण्यातील एका मल्टिप्लेक्समध्ये या चित्रपटाचे १८ शोज लागले होते आणि तेसुद्धा सगळे हाऊसफुल्ल. प्रेक्षकांबरोबरच पत्रकारांकडूनही या चित्रपटाचे प्रचंड कौतुक होत असून वर्तमानपत्रे, न्यूज चॅनेल्स, सिनेसृष्टीकडूनही ‘झिम्मा’ला सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. सोशल मीडियावरही या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे.

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘चलचित्र कंपनी’ प्रस्तुत ‘अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट’ आणि ‘क्रेझी फ्यू फिल्म्स’ निर्मित ‘झिम्मा’ चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून छायाचित्रीकरण संजय मेमाणे यांनी केले आहे. क्षिती जोग यांच्यासोबत स्वाती खोपकर, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, सनी शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

‘झिम्मा’ चित्रपटाला मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ” सर्वप्रथम ‘झिम्मा’ला मिळत असणाऱ्या प्रेमाबद्दल मी सर्व मराठी प्रेक्षकांचे आभार मानतो. त्यांच्या या पाठिंब्यामुळे एक प्रकारचे बळ मिळाले आहे. या चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे प्रेक्षकांचे मराठी चित्रपटसृष्टीवर किती प्रेम आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. विशेष म्हणजे शासनाच्या नियमांनुसार पन्नास टक्के सीट्सची परवानगी असूनही कोरोनाबद्दलच्या भीतीवर मात करत, प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये येऊन चित्रपटाचा आनंद घेत आहेत.’’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading