नामफलकातून कार्यकर्त्यांच्या स्मृती व आठवणी जागविण्याचे कार्य – चंद्रकांत पाटील

पुणे : सर्वसामान्य नागरिकांना रक्त सहज उपलब्ध व्हावे, याकरीता सामाजिक कार्यकर्ते सुरेश माळवदकर यांनी मोठे कार्य केले. अशा कार्यकर्त्यांचे काम समाजासमोर येण्यासोबत त्यांची आठवण कायम रहायला हवी. नामफलकाच्या माध्यमातून जुन्या स्मृतींना लक्षात ठेऊन आठवणी जागविण्याचे काम केले जात आहे, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

नवी पेठेतील भिडे हॉस्पिटलसमोरील चौकाला सामाजिक कार्यकर्ते स्व. सुरेश (अप्पा) माळवदकर चौक असे नाव देण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी जोरदार पाऊस पडत असताना देखील भर पावसात भिजत चंद्रकांत पाटील यांनी भाषण केले. यावेळी खासदार गिरीश बापट, साहित्यिक रामदास फुटाणे, माजी आमदार विश्वास गांगुर्डे,  नगरसेविका सरस्वती शेंडगे, नगरसेवक धीरज घाटे, स्मिता वस्ते, रघुनाथ गौडा, भाजपा ओबीसी मोर्चा  पुणे शहराध्यक्ष योगेश पिंगळे, श्रीपाद ढेकणे, आयोजक ओंकार माळवदकर व माळवदकर कुटुंबिय उपस्थित होते.

ओंकार माळवदकर म्हणाले, माणसांनी माणसांसाठी चालविलेली रक्तपेढीची चळवळ आम्ही पुढे चालवित आहोत. स्व. सुरेश माळवदकरांनी ही संकल्पना पुढे आणली. रक्तदान चळवळीत मोठे कार्य केले. सामाजिक क्षेत्रात देखील त्यांचा सहभाग होता. कोणत्याही सुविधा नसताना प्रतिकूल परिस्थितीत लोकांना जोडण्याचे काम त्यांनी केले. त्यांचे हे कार्य आम्ही रक्तदाता सूचीच्या माध्यमातून करीत असून आजपर्यंत ५ हजार नागरिकांच्या रक्तगटांची सूची आमच्याकडे तयार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: