पूनावाला फिनकॉर्प आणि कार्स २४ यांच्यातर्फे सीमलेस ग्राहक वित्तपुरवठ्यासाठी धोरणात्मक भागीदारी जाहीर

पुणे : पूर्वमालकी असणाऱ्या वाहनांसाठीचा भारतातील आघाडीचा इ-कॉमर्स प्लॅटफॉर्म कार्स २४ आणि नॉन बँकिंग वित्त कंपनी (एनडी-एसआय-एनबीएफसी) पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड (पूर्वीचे मॅग्मा फिनकॉर्प लिमिटेड) यांनी कार्स २४ मधून खरेदी केलेल्या वाहनांवर जलद आणि सीमलेस ग्राहक वित्तपुरवठ्यासाठी आपली धोरणात्मक भागीदारी जाहीर केली आहे.

या भागीदारीमध्ये पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड कार्स२४ च्या माध्यमातून घेतलेल्या ग्राहक कर्जाची पूर्तता करेल. जोडीला, जोखीम आणि मोबदला या दोन्हीमध्ये या कंपन्या सहभागी होतील.

या धोरणात्मक भागीदारी बद्दल बोलताना विजय देशवाल पूनावाला फिनकॉर्प लिमिटेडचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले, “प्रीओन्ड कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सीमलेस वित्तपुरवठा करण्यासाठी कार्स २४ बरोबर भागीदारी करताना आम्हांला खूप आनंद होत आहे. अलिकडच्या काळात स्वतःच्या मालकीची कार असणे ही गरजेची गोष्ट बनत आहे आणि महामारीमुळे तर या गोष्टीला अधिकच चालना मिळत आहे. तंत्रज्ञानाला केंद्रस्थानी ठेवताना पूनावाला फिनकॉर्पचे ध्येय डिजिटली सक्षम ग्राहक कर्ज प्लॅटफॉर्म निर्माण करणे हे आहे आणि कार्स २४ बरोबरची भागीदारी हे या त्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. ही भागीदारी खूप चांगली होईल आणि स्वतःच्या मालकीची कार असण्याचे ग्राहकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना आम्ही विना अडथळा अनुभव देऊ शकू याबद्दल आम्ही खूप आशावादी आहोत.”

कार्स २४ चे सह-संस्थापक आणि सीएफओ रुचित अगरवाल म्हणाले, “वापरलेल्या कार्सच्या उद्योगात केवळ २०% ग्राहक वित्तपुरवठा आहे त्यामुळे या क्षेत्रात मोठी बाजारपेठीय संधी असल्याचे आम्हांला जाणवले. पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड (पूर्वीचे मॅग्मा फिनकॉर्प लिमिटेड) यांच्याशी असलेली आमची भागीदारी ही ग्राहकांसाठी सुलभ, सुरक्षीत आणि पारदर्शक वित्तपुरवठा करण्याच्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे. यामुळे अधिकाधिक भारतीयांचे स्वतःच्या मालकीची कार घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल. या भागीदारीमुळे वापरलेल्या कार्सची खरेदी, विक्री आणि वित्तपुरवठा प्रक्रिया सुलभ करून वापरलेल्या कार्स क्षेत्रात सर्व सुविधा पुरविणारे केंद्र बनण्याच्या आमच्या ध्येयाच्या जवळ आम्ही जाऊ याची आम्हांला खात्री आहे.”

Leave a Reply

%d bloggers like this: