इंदिरा गांधी यांनी धाडसी नेतृत्वाने महत्त्वपूर्ण कामगिरी केली – श्रीरंग चव्हाण पाटील

पुणे: बँकाचे राष्ट्रीयकरण, पोखरण अण्वस्त्र कार्यक्रम आणि भारत-पाकिस्तान युद्ध या बाबींमध्ये स्वतःच्या धाडसी नेतृत्वाने महत्त्वपूर्ण कामगिरी केली असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव श्रीरंग चव्हाण पाटील यांनी केले. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, आयर्न लेडी ऑफ इंडिया ‘भारतरत्न’ इंदिराजी गांधी यांच्या जयंती निमित्त धायरी येथे खडकवासला काँग्रेस च्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले चव्हाण पाटील यांच्या हस्ते इंदिराजी गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अंजली अर्पण करण्यात आली.  यावेळी उपस्थित खडकवासला विधानसभा मतदार संघाचे उपाध्यक्ष संजय अभंग, भिकाजी कोकाटे, पिंगळे सर चंद्रकांत वांजळे, हिरामन पोकळे,बाळू गाडे, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: