ऑस्कर नामांकित लघुपट ‘टेलिंग पॉण्ड’च्या वर्ल्डवाइड टेलिव्हिजन प्रिमिअरची घोषणा

मुंबई : समकालीन दिग्दर्शक सौरव विष्णू दिग्दर्शित ऑस्कर नामांकित लघुपट ‘टेलिंग पॉण्ड’चा वर्ल्डवाइड टेलिव्हिजन प्रिमिअर शनिवार २० नोव्हेंबर रोजी फक्त शॉर्टस् टीव्ही नेटवर्कवर प्रसारित होणार आहे. अभिनेत्री सिंथिया निक्सॉन यांनी कथाकथन केलेल्या भारताच्या स्वातंत्र्योत्तर न्युक्लियर प्रोग्रॅमबाबत माहिती देणारा हा चलित लघुपट आहे.

भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८ वाजता शॉर्टस् टीव्हीवर, टाटा स्काय (चॅनेल क्रमांक ११३), डीश टीव्ही व डी२एच (चॅनेल क्रमांक १३५) आणि एअरटेल डिजिटल टीव्ही (चॅनेल क्रमांक २५९) या माध्यमातून तसेच एअरटेल एक्स्ट्रीम अॅपवरील शॉर्टस् टीव्ही व अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ चॅनेल्सवर देखील उपलब्ध असेल.

लघुपट ‘टेलिंग पॉण्ड’ जादुगोरा, झारखंडमधील आदिवासी कुटुंबांना सामना करावा लागलेल्या गंभीर वैद्यकीय स्थितींना दाखवतो. या संकटाचे प्रमुख कारण युरेनियम रेडिएशन आहे. हा २० मिनिटांचा लघुपट प्रेक्षकांना निरागस आदिवासी लोकांवर युरेनियमच्या घातक परिणामांची सविस्तर माहिती देतो.

‘टेलिंग पॉण्ड’चे दिग्दर्शक सौरव विष्णू म्हणाले, “झारखंडमधील असल्यामुळे मी स्वत: जादुगोराच्या लोकांची अस्सल कथा समोर आणण्याची जबाबदारी घेतली. मला आनंद होत आहे की, जादुगोराच्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला कॅमेराच्या माध्यमातून त्‍यांच्या जीवनाचा माहितीपट तयार करून त्यांची कथा संपूर्ण जगासमोर मांडण्याची संधी दिली. आम्‍ही हा लघुपट दाखवता येईल असे जागतिक मंच देण्यासाठी शॉर्टस् टीव्हीचे, तसेच या थोर कार्याला आवाज देण्यासाठी सिंथिया निक्सॉन यांचे आभार मानतो. आमचा उद्देश लोकांना जादुगोरा चर्चा करण्यास भाग पाडण्यासोबत भारतातील धोरणामध्ये परिवर्तन करण्याचा आहे. आम्हाला आनंद होत आहे की, भारत व जगभरातील प्रेक्षकांना आता हा महत्त्वपूर्ण लघुपट पाहायला मिळेल.”

‘टेलिंग पॉण्ड’ युरेनियम खाणकामाचे घातक परिणाम आणि जादुगोराच्या लोकांच्या आरोग्यावरील त्यांच्या प्रतिकूल परिणामांबाबत माहिती सांगेल. १९५१ मध्ये भारत सरकारला युरेनियममधील भवितव्य समजले आणि १९६७ मध्ये देशातील सर्व युरेनियम खाण क्रियांवर देखरेख करण्यासाठी युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (यूसीआयएल)ची स्थापना करण्यात आली. पण, यूसीआयएलची स्‍थापना जादुगोरा येथील आदिवासी कुटुंबांच्या जीवनासाठी विनाशकारी ठरले. हा हृदयस्पर्शी माहितीपट एका गावाने पिढ्यांपासून सामना केलेल्या घातक आरोग्यविषयक परिणामांना प्रकाशझोतात आणतो.

Leave a Reply

%d bloggers like this: