fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

बालकस्नेही विकासकामात पुणे महानगरपालिका देशात तिसऱ्या क्रमांकावर 

पुणे : नेदरलँड्सस्थित बर्नार्ड वॅन लीअर फाउंडेशनच्या माध्यमातून २०१७ पासून पुणे महापालिकेच्या वतीने ‘अर्बन-९५’ या संकल्पनेवर आधारित बालकस्नेही विकासकामांचे नियोजन केले जाते आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्याने असा उपक्रम राबविणारी पुणे ही राज्यातील पहिली, तर देशातील तिसरी महापालिका ठरली आहे.

लहान मुलांना चालण्यासाठी किंवा फिरण्यासाठी आजूबाजूचा परिसर योग्य नसेल, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसेल, तर मुले पालकांसोबत बाहेर जाण्यास टाळाटाळ करतात. याचा दीर्घकालीन परिणाम मुलांच्या शारीरिक हालचाली आणि मेंदूच्या कार्यक्षमतेवर होत असल्याचे अभ्यासाअंती समोर आले आहे. यामुळे मुलांसाठी सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्याची गरज असल्याचे लक्षात आल्यानंतर जगभरात या दिशेने प्रयत्न सुरू झाले. बर्नार्ड वॅन लीअर फाउंडेशनच्या माध्यमातून जगभरातील १३ शहरांत ‘अर्बन-९५’ या नावाने हा उपक्रम राबविला जातो. दुसऱ्या टप्प्यासाठी महापालिकेस ‘इजिस इंटरनॅशनल’, ‘इजिस इंडिया’ आणि ‘आगा खान फाउंडेशन’ यांची मदत होणार आहे.

लहान मुले, शालेय विद्यार्थी, त्यांचे पालक, तसेच गर्भवती महिलांना केंद्रस्थानी ठेवून वाहतूक नियोजन व रस्ते विकास करण्याबरोबरच त्यांच्यासाठीच्या सुविधांची व्याप्ती वाढविण्याचे महापालिकेने ठरविले आहे. ‘अर्बन-९५’ या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत ही कामे करण्यात येणार आहेत. ‘अर्बन-९५’च्या पहिल्या टप्प्यात पुणे, उदयपूर आणि भुवनेश्वर या तीन शहरांचा समावेश होता. आता पुणे आणि उदयपूरमध्ये या उपक्रमाचा दुसरा टप्पा राबविला जाणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading