fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

ललित कला केंद्रात ललित पौर्णिमेचे आयोजन

 

१९ नोव्हेंबर रोजी रात्रभर संगीत, नृत्य व नाटकांचे सादरीकरण

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र गुरूकुल, भीमसेन जोशी अध्यासन तसेच भारतीय लोककला अभ्यास संशोधन आणि कल्याण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.१९ नोव्हेंबर रोजी म्हणजेच कार्तिक पोर्णिमेच्या मुहूर्तावर ‘ललित पौर्णिमा’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

विभागाच्या माजी विद्यार्थ्यांच्या संगीत, नृत्य व नाटय सादरीकरणचा ‘ललित पौर्णिमा’ हा कार्यक्रम रात्री ९ ते ६ असा रात्रभर ललित कला केंद्र परिसरातील ‘अंगणमंच’ येथे सादर करण्यात येणार आहे.

यावेळी माधवी केळकर यांचे शास्त्रीय गायन, मराठी लोक परंपरामधील पहाटगीते, ‘चंद्ररोहीणी’ ही नृत्यनाटिका ‘अपवाद अणि नियम’ ‘आलोर गान’ वाघाची गोष्ट हे नाटयप्रयोग तर ‘सोंगाडया कॉकटेल’, ‘बंधमुक्त’ आणि ‘केळूरीतल नाटक, हे एकपात्री प्रयोग सादर होणार आहे.

मार्च २०२० पासून जगभरावर कोविड-१९ च्या संकटाने आक्रमण केले होते. साथीचा आजार असल्यामुळे टाळेबंदी, संचारबंदी तसेच अनेक प्रकाराचे निर्बंध आले. इतर सर्व क्षेत्रांसोबतच शिक्षण क्षेत्र आणि मनोरंजन क्षेत्र या दोन्ही क्षेत्रांना बंदी आणि निर्बंधांचा मोठाच फटका बसला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र गुरूकुल विभागात प्रयोगकलांचे प्रशिक्षण देत असल्यामुळे विभागाला तसेच विभागातील विद्यार्थ्यांना याची दोन्ही प्रकारे झळ बसली. गेल्या २२ ऑक्टोबरपासून सांस्कृतिक कार्यक्रम व या महिन्यापासून शाळा-महाविद्यालये खुली झलेली आहेत. अशा वेळेस विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी तसेच गेल्या दीड-पावणेदोन वर्षातले मळभ दूर सारून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होण्यासाठी ललित कला केंद्र गुरूकुलतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्रभर चालणा-या या कार्यक्रमाला कोणतेही प्रवेश मूल्य नसेल. करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जाहीर केलेल्या सर्व नियमांची अंमलबजावणी करून प्रेक्षकांना प्रवेश दिला जाईल, अशी माहिती ललित कला केंद्राचे विभागप्रमुख डॉ. प्रवीण भोळे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading