मालेगावची घटना ही देशात अराजक माजवण्यासाठी केलेला एक प्रयोग – देवेंद्र फडणवीस

मुंबई : मालेगावची घटना साधी नव्हती. हा एक प्रयोग होता. देशात अराजक माजवण्यासाठी अल्पसंख्यकांचे ध्रुवीकरण करण्यासाठी विचार करून केलेला हा एक प्रयोग आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच यावेळी हिंदूंची दुकाने निवडून निवडून जाळली जातात. दुकान हिंदूचे असो की मुस्लिमांचे ते जाळणं चुकीचच आहे. पण एएक तरी महाविकास आघाडीचा नेता त्यावर बोलला का?, असा सवालही फडणवीसांनी यावेळी उपस्थित केला.

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची आज बैठक पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हा गंभीर आरोप केला.

फडणवीस म्हणाले, आता विचाराचा नक्षलवाद संपला आहे. आता एक नक्षल अर्थव्यवस्था तयार झाली आहे. एक रेड कॉरिडोअर तयार झाला आहे. नेपाळपासून साऊथ पर्यंत हे नेक्सस आहे. नक्षलवाद्यांकडून साहित्य सापडलं आहे. त्यातून त्यांना आयसिस आणि पाकिस्तानकडून कशी मदत मिळते हे दिसून आलं आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे.

आज या सरकारमध्ये हर्बल तंबाखू, वसुली, स्थगिती, बदली, खंडणी यावर चर्चा होते. पण शेतकरी आणि गोरगरिबांवर चर्चा होत नाही. या सरकारच्या काळात हजारो कोटीची लूट सुरू आहे. वाटमारी सुरू आहे. पण सामान्य लोकांकडे पाहायला कुणालाही वेळ नाही. सुधीरभाऊंनी चांगला राजकीय प्रस्ताव मांडला. या सरकारचे कपडे काढले. पण सुधीर भाऊ यांचे कितीही कपडे काढले तरी या निर्लज्जांना काही फार परिणाम होतो असं नाही. त्यामुळे आता आपल्याला या सरकारच्या विरोधात एल्गार पुकारून रस्त्यावर उतरवावेच लागेल.

आम्ही दंगल करणारे नाही

आम्ही दंगल करणारे लोक नाही. भाजप कधी दंगल करत नाही. पण आमच्या अंगावर कोणी चालून आलं तर आम्ही शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. यापुढे आम्ही हिंदूंची दुकाने जळू देणार नाही. सरकार अशा घटनांना आशीर्वाद देणार असेल तर हिंदू रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.

Leave a Reply

%d bloggers like this: