शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक असून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांना न्यूमोनिआ झाला आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. गेल्या वीस दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडकीकर यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली. काही दिवसांपुर्वी बाबासाहेब पुरंदरेंना घरात पाय घसरून पडल्याने इजा झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.  सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. दरम्यान, बाबासाहेब पुरंदरे यांनी 29 जुलै रोजी वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले होते. महाराष्ट्र सरकारने त्यांना राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘महाराष्ट्र भूषण’ देऊन गौरव केला होता.

Leave a Reply

%d bloggers like this: