Pune- आगामी स्थानिक स्वराज्यसंस्था निवडणूका संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकदीने लढवणार -चंद्रशेखर घाडगे

पुणे:संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा पदाधिकारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, बैठकी मध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक बाबत तसेच ३० नोव्हेंम्बर २०२१ रोजी मुंबई येथे होणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या वर्धापनदीन नियोजना संदर्भात चर्चा करण्यात आली, संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

३० नोव्हेंम्बर रोजी मुंबई येथे होणाऱ्या संभाजी ब्रिगेड च्या वर्धापनदिन सोहळ्याला पुणे जिल्ह्यातून जास्तीजास्त कार्यकर्ते जातील, तसेच जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या निवडणूका संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकदीने लढवणार आहे, अनेक जण संभाजी ब्रिगेड मध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत, जे संपर्कात आहेत ते लवकरच संभाजी ब्रिगेड मध्ये प्रवेश करतील संभाजी ब्रिगेडचे नेते प्रदेशाध्यक्ष मनोजदादा आखरे व महासचिव सौरभदादा खेडेकर यांच्या सोबत चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ असे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी सांगितले,

बैठकीला संभाजी ब्रिगेड चे जिल्हा कार्याध्यक्ष साजिद सय्यद, सचिव निलेश ढगे, मावळ लोकसभा कार्याध्यक्ष दिनकर केदारी, जिल्हा उपाध्यक्ष रणजित बिराजदार, सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष सोनू शेलार, शिरूर तालुकाध्यक्ष अक्षय गायकवाड, जिल्हा संघटक हनुमंत गुरव, कामगार आघाडी संघटक अंकुश हाके, वाहतूक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष इस्माईल शेख उपस्थित होते.

यावेळी ओमकार गुरव विद्यार्थी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष, आनंद कांबळे माल वाहतूक जिल्हा उपाध्यक्ष, चांदभाई तांबोळी प्लम्बर कामगार आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष, आदमभाई तांबोळी व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष, संतोष सुर्यवंशी स्वच्छता कामगार आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष, या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पदनियुक्ती देण्यात आली, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी नियुक्ती पत्र दिले,

Leave a Reply

%d bloggers like this: