मध्य रेल्वेने साजरा केला माथेरान रेल्वे उत्सव

माथेरान : मध्य रेल्वेने पर्यावरण संवर्धन आणि माथेरानच्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणखी एक सकारात्मक पाऊल उचलले. मध्य रेल्वे १३ आणि १४ नोव्हेंबर २०२१ रोजी माथेरान नगरपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने माथेरान रेल्वे उत्सव हा २ दिवसीय सांस्कृतिक महोत्सव साजरा करीत आहे. यामध्ये सांस्कृतिक लँडस्केप म्हणून माथेरान लाइट रेल्वे (एमएलआर) देखील प्रक्षेपित करेल आणि सांस्कृतिक लँडस्केपच्या संरक्षण आणि व्यवस्थापनासाठी युनेस्को ग्रीस मेलिना मर्क्युरी आंतरराष्ट्रीय पारिपारितोषिक-२०२१ साठी देखील शिफारस केली जाणार

या महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक के. दादाभोय हे प्रमुख पाहुणे होते. ए के गुप्ता, प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता, शलभ गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई विभाग आणि मध्य रेल्वेचे इतर वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी हसेची पट्टी ग्रुपचे आदिवासी लोकनृत्य आणि विभागीय सांस्कृतिक अकादमी, मुंबई विभागाच्या कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रमही महोत्सवात सादर करण्यात आला.

मध्य रेल्वेने पर्यावरण संवर्धनासाठी विविध पावले उचलली आहेत. गेल्या चार वर्षांत मध्य रेल्वेने रेल्वेच्या जमिनीवर विविध प्रकारच्या झाडांच्या १८ लाखांहून अधिक रोपांची लागवड केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे दुर्मिळ मसाले आणि औषधी वनस्पतींची १२० रोपे असलेले वनौषधी उद्यान उभारण्यात आले आहे. मध्य रेल्वेवर १५ रोपवाटिकांची स्थापना आणि विकास करण्यात आला आहे. ८७ इको-स्मार्ट स्टेशन्स, वाडीबंदर, मुंबई येथे ऑटोमॅटिक कोच वॉशिंग प्लांट, १३३ स्थानकांवर रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट्स, ५ इमारतींना IGBC ग्रीन सर्टिफिकेशन इ. हे मध्य रेल्वेने गेल्या काही वर्षांत हरित पर्यावरणासाठी केलेले इतर काही उपक्रम आणि ॲचिव्हमेंट्स आहेत. माथेरान उत्सव हे पर्यावरणाचे संवर्धन आणि माथेरानच्या पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या दिशेने मध्य रेल्वेचे आणखी एक सकारात्मक पाऊल आहे.

अमन लॉज आणि माथेरान दरम्यानच्या प्रवाशांसाठी शटल सेवेसह मध्य रेल्वेने हे ठिकाण केवळ एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून नव्हे तर निसर्गाच्या जवळ जाणारे ठिकाण म्हणून लोकप्रिय करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या पर्यटन स्थळी येणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास उपलब्ध करून देण्यात रेल्वे महत्त्वाची भूमिका बजावत आहे, त्यामुळे स्थानिकांना उपजीविका उपलब्ध करून देत माथेरानची अर्थव्यवस्था सुधारण्यास हातभार लावत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: