fbpx

बालदिनानिमित्त आर्यन काशीकरचा विश्वविक्रमाला गवसणी घालण्याचा प्रयत्न

ओरीगामी कलेद्वारे सील माशांच्या २,११ प्रतिकृती बनवीत नवे गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्याचा आर्यनचा मानस

पुणे : बालदिनाचे औचित्य साधत पुण्यातील सिंम्बायोसिस शाळेत इयत्ता ९ वीचा विद्यार्थी असलेल्या आर्यन काशीकर याने ओरिगामी कलेच्या माध्यमातून विश्वविक्रमाला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या ११ महिन्यांच्या अथक प्रयत्नांद्वारे आर्यनने कागदाच्या वापरातून तयार केलेल्या २,११ हून अधिक सील माशांच्या प्रतिकृतींचे एक आगळे वेगळे प्रदर्शन प्रभात रस्त्यावरील सिंम्बायोसिस शाळेच्या बॅडमिंटन कोर्टवर भरविण्यात आले होते. आर्यनने आपल्या प्रतिकृतींची मांडणी ही खास तिरंग्याच्या रंगात साकारली होती.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेला याआधीचा २००० सील माशांच्या प्रतिकृतींचा विक्रम मोडण्याचा आर्यनचा हा प्रयत्न आहे. यादृष्टीने आज सदर प्रयत्नाचे परीक्षण केले गेले. परीक्षक म्हणून ओरिगामी कलेच्या क्षेत्रात गेली २५ वर्षे कार्यरत असलेल्या व पुण्यातील ओरिगामी मित्र या संस्थेच्या मानद सदस्या स्वाती धर्माधिकारी, अॅड. श्रीकांत दळवी आणि अॅड. दिपाली डुंबरे यांनी पंच म्हणून काम पाहिले.

आर्यनची आई प्रज्ञा काशीकर, वडील अमित काशीकर, प्रभात रस्त्यावरील सिंम्बायोसिसच्या शाळेच्या मुख्याध्यापिका वीणा हवनुरकर, सिंबायोसिस स्पोर्ट्स सेंटरचे संचालक डॉ. एस एस ठिगळे आणि येथील प्रतिकृतींच्या मांडणीचे रचनाकार आशिष खळदकर आदी या वेळी उपस्थित होते.

याविषयी अधिक माहिती देताना आर्यन म्हणाला, “वयाच्या सातव्या वर्षी आई वडिलांनी माझी या कलेशी ओळख करून दिली. त्यानंतर यु ट्यूबच्या आणि पुण्यातील ओरिगामी मित्र यांच्या माध्यमातून मी हळूहळू ती शिकू लागलो. २०१९ साली ओरिगामी मित्र आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वंडरफोल्ड या चार दिवसीय प्रदर्शनात भाग घेण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे यामध्ये आणखी काय करता येईल, या उत्सुकतेने वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची कल्पना आली. आज नवीन विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न माझ्याकडून झाला याचा मला आनंद आहे.”

खरेतर टीव्ही, मोबाईलपासून आर्यनला थोडे दूर ठेवावे, या उद्देशाने आम्ही आर्यनला ओरिगामीची ओळख करून दिली. मागील ११ महिने आर्यन यासाठी प्रयत्न करीत आहे. त्याने एकट्याने २,११ ओरिगामी कागदांच्या फोर्ल्डस करीत कोणाचीही मदत न घेता केलेला हा प्रयत्न उल्लेखनीय असल्याचे आर्यनची आई प्रज्ञा काशीकर यांनी नमूद केले.

Leave a Reply

%d bloggers like this: