ड्रूम टेक्नोलॉजी या ऑटोमोबाइल ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मतर्फे आयपीओसाठी प्रस्ताव सादर

ड्रूम टेक्नोलॉजी लिमिटेड या तंत्रज्ञान व डेटा सायन्सवर आधारित ऑनलाइन ईकॉमर्स प्लॅटफॉर्मने इनिशिअल शेअर विक्रीच्या माध्यमातून निधी उभा करण्यासाठी भांडवली बाजार नियामक असलेल्या सेबीकडे प्राथमिक कागदपत्रे सादर केली आहेत.

हे पाऊल उचलल्यावर कारट्रेडनंतर सार्वजनिक होणारी ही दुसरी भारतीय ऑटोमोबाइल ऑनलाइन कंपनी आहे.

इनिशिअल पब्लिक ऑफरिंगमध्ये ड्रूम टेक्नोलॉजीच्या रु.1 इतके दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे. या ऑफरमध्ये रु.2,000 कोटी पर्यंतच्या फ्रेश इश्युचा आणि रु.1,000 कोटीपर्यंतच्या विक्रीच्या ऑफरचा समावेश आहे. कंपनीचे इक्विटी शेअर्स बीएसई आणि एनसईमध्ये सूचिबद्ध करण्यात येतील.

सेबीमध्ये सादर केलेल्या ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार (डीआरएचपी) ओएफएसचा भाग म्हणून ड्रूम पीटीई लि. ही सिंगापूर येथील होल्डिंग कंपनी रु.1000 कोटीपर्यंत विक्री करणार आहे.

या व्यतिरिक्त या इश्युसाठी असलेल्या लीड बँकर्सच्या सल्ल्याने त्याहूनही अधिक इक्विटी शेअर्स इश्यु करण्याबाबत विचार केला जाऊ शकतो. यात रु.400 कोटींपर्यंतच्या प्रायव्हेट प्लेसमेंटचा समावेश असू शकेल. अशी प्लेसमेंट पूर्ण झाली तर फ्रेश इश्युचा आकार कमी होईल.

या फ्रेश इश्युमधून संकलित होणाऱ्या निधीचा वापर ऑरगॅनिक व इनऑरगॅनिक ग्रोथ उपक्रमांसाठी करण्यात येईल, जो एकूण अनुक्रमे रु.1,150 कोटी आणि रु.400 कोटी इतका असेल आणि इतर सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी हा निधी वापरण्यात येईल.

ड्रूम ही तंत्रज्ञान व डेटा सायन्स कंपनी आहे. ही कंपनी ऑटोमोबाइल उद्योगासाठी उत्पादन व सेवांच्या व्हर्टिकली इंटिग्रेटेड इकोसिस्टिमसह त्यांच्या अॅसेट लाइट प्लॅटफॉर्मची सांगड घालून ऑटोमोबाइलची खरेदी व विक्रीची सुविधा प्रदान करते. 2018 साली मलेशियापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर कामकाज सुरू केले आणि त्यानंतर 38 देशांमध्ये विस्तारीकरण केले.

ही कंपनी अशी एकमेव भारतीय कंपनी आहे जी पूर्णपणे ऑनलाइन ट्रान्झॅक्शनल मॉडेलवर आधारित आहे आणि भारतातील प्रमुख ऑनलाइन कंपन्यांचा विचार करता ऑटोमोबाइल्सचे सर्वाधिक पर्याय उपलब्ध करून देणारी एक कंपनी आहे. ग्रँट थॉर्नटन रिपोर्टनुसार 30 सप्टेंबर, 2021पर्यंत या प्लॅटफॉर्मवर 1.15 मिलियन वाहने यात सूचिबद्ध आहेत, ज्यात नव्या व वापरलेल्या कार आणि दुचाकी व इतर वाहनांचा समावेश आहे.

30 सप्टेंबर, 2021 रोजी समाप्त झालेल्या पहिल्या सहामाहीमध्ये त्यांच्या वेबसाइट/अॅपला 89.27 मिलियन वेळा भेट दिली गेली आहे आणि 1,151 शहरांमध्ये 20,725 ऑटो डीलर्स आहेत. त्यांच्याकडे 11 कॅटेगरींमध्ये 2,78,807 वापरलेली वाहने आहेत ज्यांचे मूल्य रु.146.49 बिलियन आहे आणि त्यांनी 56,412 वाहनांची विक्री केली आणि त्यांचा जीएमव्ही रु.59,347.25 बिलियन इतका आहे.

ड्रूमचे नेतृत्व एक अनुभवी टीम करत आहे ज्यांच्याकडे या उद्योगाचा दांडगा अनुभव आहे. या कंपनीचे संस्थापक, प्रवर्तक, अध्यक्ष, होल टाइम डायरेक्टर आणि मुख्य कार्यकारी अदिकारी संदीप अग्गरवाल यांना या तंत्रज्ञानातील व स्टार्ट अप क्षेत्रातील 20 वर्षांहून अधिक अनुभव आहे आणि त्यांनी यापूर्वी ShopClues.com या आघाडीच्या भारतीय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची स्थापना केली होती. अक्षय सिंग हे सध्याचे सीएसओ (चीफ स्ट्रॅटजी ऑफिसर) आणि मोहित अहुजा हे चीफ मार्केटिंग ऑफिसर आहेत.

भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योग हा सध्या पाचव्या क्रमांकाचा सर्वात मोठा ऑटोमोटिव्ह उद्योग आहे आणि 2026 या आर्थिक वर्षापर्यंत व्हॉल्यूमचाविचार करता हा उद्योग जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ऑटोमोटिव्ह उद्योग होणार आहे. क्रयशक्ती वाढणे, मध्यमवर्गामध्ये वाढ होणे, वाढते शहरीकरण आणि वैयक्तिक वाहनांना मिळणारे प्राधान्य या घटकांमुळे ही चालना मिळत आहे. 2021 या आर्थिक वर्षापासून 17.3% च्या सीएजीआरने ही वाढ होणे होऊन आर्थिक वर्ष 2026 पर्यंत या उद्योगाची उलाढाल रु.36,725 कोटी इतकी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड, एडलवाइस फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड, एचएसबीसी सिक्युरिटीज अँड कॅपिटल मार्केट्स (इंडिया) लिमिटेड आणि नोमुरा फायनान्शिअल अॅडव्हायजरी अँड सिक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्युसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: