बागायती शेतीच्या यांत्रिकीकरणामध्ये ‘स्वराज ट्रॅक्टर्स’ची आघाडी

मोहाली  : महिंद्रा समुहाचा भाग असलेल्या ‘स्वराज ट्रॅक्टर्स’ने भारतातील बागायती शेतीमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आज कोड हे एक नवीन क्रांतिकारक बहुउद्देशीय कृषी यांत्रिकीकरण सोल्यूशन सादर केले.

बागायती शेतीमध्ये जे अविरत कष्ट घ्यावे लागतात, ते कमी करण्याच्या उद्देशाने कोड हे यंत्र बनविण्यात आले आहे. त्याचे डिझाईन आपल्या देशातच तयार करण्यात आले. सर्वात अरुंद आणि सर्वात हलके राइड-ऑन मशीन असलेल्या या कोडमुळे भारतातील बागायती शेतीमध्ये क्रांती घडून येईल. या यंत्रामुळे शेतकऱ्यांना विविध प्रकारचा भाजीपाला आणि फळे या पिकांच्या अरुंद रांगांमध्ये आंतरपिके घेता येतील. याव्यतिरिक्त, या यंत्राची वळण्याची त्रिज्या अगदी लहान असल्याने, बागायती पिके घेणाऱ्या लहान शेतांमध्ये कुशलतेने काम करता येते.

बागायती शेती क्षेत्रात कोड सादर करण्याविषयी ‘महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड’च्या फार्म इक्विपमेंट सेक्टरचे प्रमुख हेमंत सिक्का म्हणाले, “गेल्या काही वर्षांत भारताच्या कृषी उत्पादनामध्ये बागायती क्षेत्राचा वाढता वाटा पाहता, या विभागाच्या उत्पादकतेवर लक्ष केंद्रित करण्याची नितांत गरज आहे. ‘स्वराज’चे ‘कोड’ हे एक नाविन्यपूर्ण कृषी यांत्रिकीकरण यंत्र आहे. ‘महिंद्रा फार्म इक्विपमेंट सेक्टर’च्या ‘ट्रान्सफॉर्म फार्मिंग आणि एनरिचिंग लाईव्हज’ या उद्देशाशी त्याची नाळ पूर्णपणे जुळते. ‘कोड’ सादर करताना आम्ही शेतकरी समुदायाला परवडणारे व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान पुरविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.”

‘स्वराज ट्रॅक्टर्स’चे सीईओ हरीश चव्हाण ‘कोड’च्या सादरीकरणाबद्दल म्हणाले, “आपल्या देशात बागायती विभागामध्ये यांत्रिकीकरणाला मोठा वाव आहे. स्वराजने कोड हे विशेष यंत्र विकसीत करताना ग्राहकांच्या गरजांचा व मानसिकतेचा सखोल विचार केला आहे. आतापर्यंत या क्षेत्रात कामगारांनी हाताने व पशूंच्या मदतीने काम करण्याची पद्धत होती. ‘कोड’ या नावीन्यपूर्ण यंत्रामुळे या विभागात यांत्रिकीकरण आणण्याच्या दिशेने एक अग्रगण्य पाऊल पडले आहे.”

अद्वितीय क्षमतांनी युक्त असे ‘कोड’ हे यंत्र बागायती शेतीशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यात मदत करते. ‘खेती की दुनिया का सबसे पहला येस मशीन’ म्हणून त्यास संबोधले जाते. या उद्योगात प्रथमच सादर होणारी काही वैशिष्ट्ये या यंत्रात खास बागायती शेतकर्‍यांसाठी समाविष्ट करण्यात आली आहेत. ती पुढीलप्रमाणे :

ड्युअल ग्राउंड क्लीयरन्स – पीक उंच होत वाढत असताना या यंत्राचाही ‘ग्राउंड क्लीयरन्स’ वाढवता येतो. त्यामुळे हाताने काम करण्यावर अवलंबून राहणे कमी होते.

बाय-डायरेक्शनल ड्रायव्हिंग – या वैशिष्ट्यामुळे यंत्राच्या समोरच्या बाजूला बसवलेल्या ‘अॅटॅचमेंट्स’च्या सहाय्याने काम करणे सुलभ होते. विशेषतः भातशेतीमध्ये कापणीसाठी ही रचना अतिशय योग्य ठरते.

सुरुवातीला गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील स्वराजच्या वितरकांना ‘कोड’चे वितरण केले जाईल आणि त्यानंतर लवकरच टप्प्याटप्प्याने इतर राज्यांमध्ये ते सादर करण्यात येईल. या उत्पादनासाठी देखभालीची खात्रीशीर सेवाही देण्यात येत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: