कंगना रनौटचा पद्म पुरस्कार परत घ्या – महिला काँग्रेसची मागणी

अभिनेत्री कंगना रनौटने केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ पुणे शहर महिला काँग्रेस पार्टीचे आंदोलन

पुणे : नुकतेच पद्म पुरस्कार प्राप्त झालेली बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौटने एका मुलाखती दरम्यान भारत देशाला स्वातंत्र्य हे भिकेत मिळालेले आहे, असे वक्तव्य केले आहे. या व्यक्तव्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आंदोलन करण्यात आले. पुण्यात बालगंधर्व चौक येथे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कंगना रनौटला प्रदान करण्यात आलेला पद्म पुरस्कार परत घेतला जावा अशी मागणी करण्यात आली.

या आंदोलनाचे नेतृत्व पुणे शहर महिला काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा सोनाली मारणे यांनी केले.
यावेळी पुणे शहर महिला काँग्रेसच्या माजी आमदार दीप्ती चौधरी, माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, शर्वरी गोतारने, कांचन बालनायक, राजश्री अडसूळ, शारदा विर, रजिया बल्लारी, छायाताई जाधव, मिराताई शिंदे, ललिता जगताप, नंदा डावरे, पौर्णिमा भगत, अर्चना जाधव, ताई कसबे,गीता तारु, व काँग्रेसच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मोहन जोशी म्हणाले, ज्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्याबद्दल बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौट हिने केलेले बेताल वक्तव्य पूर्णपणे चुकीचे आहे. कंगना रनौट हिने माफी मागावी अशी आमची मागणी आहे, असे मोहन जोशी म्हणाले.

सोनाली मारणे म्हणाल्या, कंगना रनौट ही मोठी अभिनेत्री असली तरी तिला भारताच्या स्वातंत्र्य बद्दल काही बोलण्याचा अधिकार नाही. पुणे शहर महिला काँग्रेस पार्टीतर्फे आम्ही या घटनेचा निषेध व्यक्त करतो. जर कंगना रनौटने माफी मागितली नाही तर आम्ही येथील पुढील काळात कंगना रनौट विरुद्ध अजून आंदोलन तीव्र करू.

Leave a Reply

%d bloggers like this: