अखिल भारतीय खुल्या फिडे क्लासिकल रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत विक्रमादित्य कुलकर्णी, आदित्य सामंत, सौरव खेर्डेकर, सिद्धांत गायकवाड आघाडीवर

पुणे : बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित अखिल भारतीय खुल्या फिडे क्लासिकल रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्या फेरीअखेर आयएम विक्रमादित्य कुलकर्णी, पुण्याचा आदित्य सामंत, एफएम सौरव खेर्डेकर, सिद्धांत गायकवाड या खेळाडूंनी 3 गुणांसह आघाडी मिळवली आहे. 
 
अश्वमेध हॉल, पुणे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत तिसऱ्या फेरीत रेल्वेच्या आयएम विक्रमादित्य कुलकर्णीने आपली आघाडी कायम ठेवत राजस्थानच्या एएफएम नारायण जोशीचा 47 चालींमध्ये पराभव करून  3 गुण प्राप्त केले. तर, महाराष्ट्राच्या फिडे मास्टर आदित्य सामंतने  मध्यप्रदेशच्या सेरा डागारियाचा पराभव करून  3गुण प्राप्त केले.  महाराष्ट्राच्या फिडे मास्टर सौरव खेर्डेकरने आपलाच राज्य सहकारी पियुष नार्सीकरचा, तर सिद्धांत गायकवाडने आरव लखानीचा पराभव करून आपली आघाडी कायम ठेवली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: तिसरी फेरी: व्हाईट व ब्लॅक नुसार:

आयएम विक्रमादित्य कुलकर्णी(रेल्वे)(3गुण)वि.वि.एएफएम नारायण जोशी(राजस्थान)(2गुण);
सेरा डागारिया(मध्यप्रदेश)(2गुण) पराभूत वि.एफएम आदित्य सामंत(महाराष्ट्र)(3गुण);
एफएम सौरव खेर्डेकर(महाराष्ट्र)(3गुण) वि.वि.पियुष नार्सीकर(महाराष्ट्र)(2गुण);’
कुंज भानिशाली(महाराष्ट्र)(2गुण) पराभूत वि.अनदकत कर्तव्या(गुजरात)(3गुण);
आरव लखानी(महाराष्ट्र)(2गुण) पराभूत वि.सिद्धांत गायकवाड(महाराष्ट्र)(3गुण);
अंकेश वशिष्ठ(राजस्थान)(2गुण) पराभूत वि.करण त्रिवेदी(गुजरात)(3गुण);
जीत शहा(महाराष्ट्र)(3गुण) वि.वि.विरेश शरणार्थी(महाराष्ट्र)(2गुण);
स्वरा लक्ष्मी नायर(कर्नाटक)(2गुण) पराभूत वि.अक्षय बोरगावकर(महाराष्ट्र)(3गुण);
सिद्धांत ताम्हणकर(महाराष्ट्र)(3गुण) वि.वि.आदिती कायल(महाराष्ट्र)(2गुण).
ईशान नाडकर्णी(महाराष्ट्र)(2.5गुण) बरोबरी वि.आर्यन सिंगला(महाराष्ट्र)(2.5गुण);

Leave a Reply

%d bloggers like this: