शनिवार वाडयाचे पुनरुज्जीवन करण्याचे केंद्रीय मंत्र्याचे आश्वासन -आमदार मुक्ता टिळक

पुणे : केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री किशन रेड्डी यांच्याशी आमदार मुक्ता टिळक यांनी सप्टेंबर 2021 महिन्यात पत्रव्यवहार करून पुणे शहरातील ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या सद्यस्थितीची माहिती पाठवली होती. यासंदर्भात इतिहासाचे अभ्यासक डॉक्टर उदय कुलकर्णी व स्थानिक पुरातत्व खात्याचे गजानन मंडवले, आर्किटेक किरण कलमदानी यांच्याशी चर्चा करून पुनरुज्जीवनाचे सर्व आराखडे आणि खर्चाचा अंदाज केंद्रीय मंत्र्यांना सादर केला होता.


किशन रेड्डी यांनी या पत्राची दखल घेऊन या वर्षीचे काम हातात घेतले जाईल असे लेखी आश्वासन दिले आहे . अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत आमदार मुक्ता टिळक यांनी दिली. या पत्रकार परिषदेला इतिहासाचे अभ्यासक डॉक्टर उदय कुलकर्णी ,व स्थानिक पुरातत्व खात्याचे गजानन मंडवले उपस्थित होते.

मुक्ता टिळक म्हणाल्या, त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व ऐतिहासिक स्थळांची सुरक्षा व देखभाल केली जाईल असे आश्वासन पत्राद्वारे दिले आहे.  शनिवार वाड्यातील ऐतिहासिक दिल्ली दरवाजा
व त्यावरील चित्रे तसेच दर्शनी बाजूची भिंत, निखळलेले दगड पुन्हा बसवणे आधी कामे आमदारांनी प्रस्ताव केली होती. त्यासाठीचा अपेक्षित खर्च रुपये दहा कोटी आहे. या सगळ्यांचे मान्यता घेऊन लवकरच पुरातन विभाग काम सुरू करेल असा मला विश्वास वाटत आहे. असे मुक्ता टिळक म्हणाल्या.

Leave a Reply

%d bloggers like this: