बनावट नोटांच्या गोरखधंद्याला फडणवीसांचा आशीर्वाद आणि वानखेडेंची मदत – नवाब मलिक यांचा खळबळजनक आरोप

मलिक म्हणाले की, बनावट पासपोर्ट प्रकरणी रियाज भाटीला पकडलं होतं. तो अद्यापही फरार आहे. सगळ्या शहराला माहितीय रियाज भाटी कोण आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमात तो कसा जातो.  पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा रियाझ भाटीचे पंतप्रधानांसोबतही फोटो आहेत. एखादा गुंड, क्रिमीनल सहजपणे पंतप्रधानांपर्यंत पोहोचतोच कसा असा सवाल मलिक यांनी केला आहे. रियाझ भाटी हा दाऊद इब्राहीमचा माणूस आहे. तो आज फरार आहे असंही मलिक म्हणाले.

मलिकांनी यावेळी म्हटलं की, जेव्हा नोटबंदी झाली त्यावेळी खोट्या नोटा पकडले जाण्याचं प्रमाण संपूर्ण देशभरात वाढलं होतं. मात्र महाराष्ट्रातून खोट्या नोटांचं एकही प्रकरण समोर आलं नाही. 8 ऑक्टोबर 2017 मध्ये  इंटेलिजन्सकडून बीकेसीमध्ये  छापेमारी झाली. ज्यात 14 कोटी 56 लाखांच्या खोट्या नोटा सापडल्या. या प्रकरणाला फडणवीसांकडून दाबलं जाण्याकरता प्रयत्न झाले, असं ते म्हणाले. मी जे आरोप फडणवीसांवर लावतोय याबाबत मी नक्कीच गृहविभागाला माहिती देईन, असंही ते म्हणाले.

नवाब मलिकांनी म्हटलं की, 2005  साली मी मंत्रीपदावर नव्हतो.  सलीम पटेलचा मृत्यू झालाय ही माहिती मला 5 महिन्यांपूर्वी मिळाली आहे. सलीम पटेलचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या बातम्यांवरुन सलीम पटेलनं त्यावेळी अनेक माध्यमांवर डिफमेशन दाखल केले होते,

दरम्यान, अमृता फडणवीस यांच्या ट्वीटवर बोलताना ते म्हणाले की, मी महिलांच्या आरोपांवर उत्तर देणार नाही. काळ्या पैशांवरुन माझ्यावर आरोप लावले जातात. मग, 200 कोटींचे फ्लॅट बीकेसीत, वरळीत कोणाच्या नावावर आहे हे काढू का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Leave a Reply

%d bloggers like this: