मंगलमय वाद्य वाजवणाऱ्या कलावंतांना मदतीचा हात

पुणे: दिवाळीचा सण हा प्रत्येक घरात आनंदाने साजरा केला जातो. परंतु कोरोनाच्या काळात अनेकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. यातच अनेक लोककलावंतांना व त्यांच्या कुटुंबियांना उपासमारीचा सामना करावा लागला. अशा गरजू कलावंतांच्या घरी देखील दिवाळी आनंदाने साजरी व्हावी याकरिता पर्वती लक्ष्मीनगर येथील सह्याद्री सेवा संघाने पुढाकार घेत गरजू कलावंतांना दिवाळीचा फराळ, साहित्य व ब्लँकेटचे वाटप केले.

यावेळी दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर, नगरसेविका स्मिता वस्ते, विनोद वस्ते, सह्याद्री प्रतिष्ठान संघाचे अध्यक्ष रवी शिंदे, डॉ. नारायण डोलारे,  अजित घस्ते आदी उपस्थित होते. राजू महाजन, मोहित झांजले, राजेंद्र तावडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. यावेळी शाहीर, हलगी वादक, वाघ्या मुरळी आणि पारंपारिक वाद्यांचे वादन करणारे वादक तसेच महावितरणचे वायरमन यांना देखील दिवाळी किट व ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.

स्मिता वस्ते म्हणाल्या, कोरोना काळात अनेकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. पारंपारिक वाद्यांच्या माध्यमातून मंगलमय वातावरण निर्माण करणाऱ्या कलाकारांच्या घरी उपासमारीची वेळ आली. त्यांची दिवाळी देखील मंगलमय जावो, यासाठी पुढाकार घेत दिवाळी साहित्य, फराळ व ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.

Leave a Reply

%d bloggers like this: