चौथ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक – व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाला विजेतेपद  

  • जयेश पोळ, अंश धूत यांची शतकी खेळी
 
पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना क्लब यांच्या वतीने आयोजित चौथ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीने युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाविरुद्ध पहिल्या डावाच्या अधिक्याच्या जोरावर विजेतेपद संपादन केले.
 
 
पीवायसी हिंदू जिमखाना मैदानावरील तीन दिवसीय सामन्यात तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाच्या 25षटकात 1गड्याच्या बदल्यात 79धावापासून खेळास सुरुवात झाली. तत्पूर्वी पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करताना 
 
व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने 80.1षटकात सर्वबाद 273 धावा केल्या. याच्या उत्तरात युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाचा डाव 74.2षटकात सर्वबाद 269 धावावर संपुष्टात आला. 
 
व्हेरॉककडून रोहित चौधरीने 76धावात 3 गडी बाद केले. त्याला समर्थ जगतापने 41धावात 2 गडी, सुरज गोंड(1-15), हर्षवर्धन पवार(1-23) यांनी प्रत्येकी एक गडी बाद करून साथ देत संघाला पहिल्या डावात 4 धावांची आघाडी मिळवून दिली.
 
दुसऱ्या डावात व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने 107.1षटकात 7बाद 406 धावा केल्या. यामध्ये जयेश पोळने 212 चेंडूत 9चौकार व 3षटकारासह 103 धावांची संयमी खेळी केली. जयेशला यश जगदाळेने 123 चेंडूत 71 धावा काढून साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 214 चेंडूत 103 धावांची भागीदारी केली. त्यानंतर अंश धूतने 135 चेंडूत 11चौकार व 1षटकारासह 102 धावांची शतकी खेळी केली. अंश व ओमकार राजपूत(41धावा) यांनी सहाव्या विकेटसाठी 141 चेंडूत 98 धावांची भागीदारी केली. 
 
दोन्ही संघातील सामना अनिर्णित राहिल्यामुळे व्हेरॉक संघाने पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील विजेत्या संघाला राजू भालेकर स्मृती करंडक देण्यात आला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमसीएचे अध्यक्ष विकास काकतकर, एमसीएचे सचिव रियाज बागवान, रॉयल गोल्फफिल्ड क्लब रिसॉर्ट लिमिटेड, दापोलीचे अनिल छाजेड, रोहन छाजेड व अनुज छाजेड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबचे सचिव सारंग लागू, क्लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड, रिजुता भालेकर, तेजल भालेकर, क्लबचे खजिनदार चंद्रशेखर नानिवडेकर, सिद्धार्थ भावे, शिरीष साठे, इंद्रजीत कामतेकर, मनीष चौबल, कपिल खरे आदी मान्यवर उपस्थित होते. निरंजन गोडबोले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी: 
पहिला डाव: व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 80.1षटकात सर्वबाद 273 धावा वि.युनायटेड स्पोर्ट्स क्लब: 74.2षटकात सर्वबाद 269 धावा; पहिल्या डावात व्हेरॉक संघाकडे 4 धावांची आघाडी; 
 
दुसरा डाव: व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 107.1षटकात 7बाद 406 धावा(जयेश पोळ 103(212, 9×4,3×6), अंश धूत 102(135, 11×4,1×6), यश जगदाळे 71(123, 6×4), सुरज गोंड 48(66,7×4,1×6), ओमकार राजपूत 41(65,7×4), रोहित चौधरी 17, श्रीराज चव्हाण 2-79, समर्थ वाबळे 1-24, आर्यन शेजुल 1-37, मल्हार वंजारी 1-67) वि.युनायटेड स्पोर्ट्स क्लब: सामनावीर-सुरज गोंड; सामना अनिर्णित; व्हेरॉक संघ पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर विजयी.
इतर पारितोषिके:.
सर्वोत्कृष्ट फलंदाज: आदित्य राजहंस(286धावा, युनायटेड स्पोर्ट्स क्लब);
सर्वोत्कृष्ट गोलंदाज: निमिर जोशी(25 विकेट, युनायटेड स्पोर्ट्स क्लब);
मालिकावीर: आदित्य राजहंस(286 धावा व 17 विकेट);
सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक: श्रेयस जाधव(13 विकेट, युनायटेड स्पोर्ट्स क्लब);

Leave a Reply

%d bloggers like this: