एस. पी. भरेकर फॅशन स्टुडिओच्या वतीने दिवाळी निमित्त फुटपाथवरील 100 हून अधिक मुलांना कपड्यांचे वाटप

युवा उद्योजिका पायल भरेकर यांचा सामाजिक उपक्रम

पुणे : दिवाळी म्हणजे आनंदाचा सण, या सणांसाठी आपण उत्साहाने विविध गोष्टी खरेदी करत असतो. परंतु या दीपोत्सवाच्या काळातही अनेकांच्या घरात अंधार असतो, गोडधोड किंवा नवीन कपड्यांची खरेदी शक्य नसते अशा मुलांसोबत एस. पी. भरेकर फॅशन स्टुडिओच्या संचालिका, युवा उद्योजिका पायल प्रकाश भरेकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत दिवाळी साजरी केली.

सिंहगड रस्ता, राजाराम पूल आणि डेक्कन नदीपात्र परिसरात फुटपाथवर राहणाऱ्या 100 हून अधिक मुला – मुलींना आणि गरजू महिलांना कपडे वाटप  करत पायल प्रकाश भरेकर यांनी या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले. यावेळी शाम भरेकर, वैष्णवी पवार, नूतन भरेकर आदी उपस्थित होते.

या अनोख्या उपक्रमाबद्दल बोलताना पायल भरेकर म्हणाल्या की, सामाजिक बांधिलकी जपण्याची शिकवण मला वडील प्रकाश भरेकर यांनी लहानपणापासून दिली. नुकतेच मी एस. पी. भरेकर फॅशन स्टुडिओच्या माध्यमातून  फॅशन डिझायनर म्हणून काम सुरू केले आहे. आपण समाजाचे देणे लागतो या जाणिवेतून मी दिवाळीनिमित्त या गरजू मुलांना मदतीचा हात दिला आहे, भविष्यात या मुलांसाठी आश्रम काढण्याचा माझा मानस आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: