आजपासून बदलणार बँक चार्ज, रेल्वे, एलपीजी बुकिंगसह अनेक मोठे नियम! परिणाम थेट तुमच्या खिशावर होणार

नवी दिल्ली : देशातील विविध सेवांच्या नियमांमध्ये आजापासून अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत, ज्याचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होणार आहे.  1 नोव्हेंबर पासून देशभरातील बँकिंग, स्वयंपाकाचा गॅस बुकिंग नियम, रेल्वे या क्षेत्रात विविध मोठे बदल होणार आहेत. बँकेत पैसे जमा करण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठीही शुल्क आकारले जाणार आहे.  गॅस सिलिंडर बुकिंगच्या नियमांमध्येही मोठा बदल होणार आहे. यासोबतच रेल्वेच्या वेळापत्रकातही बदल होणार आहे. आजपासून  काय बदल होणार आहेत ते जाणून घेऊया.

1) रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बदलणार 

1 नोव्हेंबरपासून भारतीय रेल्वे देशभरातील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करणार आहे. याआधी 1 ऑक्टोबरपासून गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होणार होता, मात्र काही कारणांमुळे 31 ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. मात्र, आता 1 नोव्हेंबरपासून नवीन वेळापत्रक लागू होणार आहे. 13 हजार पॅसेंजर ट्रेन आणि 7 हजार मालगाड्याच्या वेळा बदलणार आहेत. एवढेच नाही तर 1 नोव्हेंबरपासून देशात धावणाऱ्या सुमारे 30 राजधानी गाड्यांच्या वेळाही बदलणार आहेत.

2) एलपीजी सिलेंडरची किंमत

1 नोव्हेंबरपासून एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल होऊ शकतो. एलपीजी च्या किमती वाढवल्या जाऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एलपीजीच्या विक्रीतील तोटा पाहता सरकार पुन्हा एकदा एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवू शकते.

3) गॅस सिलिंडर बुकिंगचे नियम

1 नोव्हेंबरपासून एलपीजी सिलिंडर वितरणाची संपूर्ण प्रक्रिया बदलणार आहे. गॅस बुक केल्यानंतर, ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जाईल. जेव्हा सिलिंडर डिलिव्हरीसाठी येतो तेव्हा तुम्हाला हा ओटीपी डिलिव्हरी बॉयसोबत शेअर करावा लागेल. हा कोड सिस्टीमशी जुळल्यानंतर ग्राहकाला फक्त सिलिंडरची डिलिव्हरी मिळेल. म्हणजेच आता थेट सिलिंडर घेता येणार नाही.

4) Whatsapp बंद होईल

काही आयफोन आणि अँड्रॉईड फोनवर 1 नोव्हेंबरपासून व्हॉट्सअॅप काम करणे बंद करेल. व्हॉट्सअॅपने दिलेल्या माहितीनुसार, 1 नोव्हेंबरपासून फेसबुकच्या मालकीचे प्लॅटफॉर्म Android 4.0.3 Ice Cream Sandwich, iOS 9 आणि KaiOS 2.5.0 ला सपोर्ट करणार नाही.

Leave a Reply

%d bloggers like this: