नागपूरचे १२ पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह; प्रशिक्षणासाठी गेले होते पुण्यात

नागपूर : पुण्यात प्रशिक्षणासाठी गेलेले नागपूरचे १२ पोलीस कर्मचारी नागपूरला परत येताच कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. त्यामुळे नागपूर पोलीस दलात खळबळ उडाली असून हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट रोजी नागपूर पोलीस दलातील ३१ पोलीस स्टेशन मधील गुप्त वार्ता विभागातील प्रत्येकी एक पोलीस कर्मचारी व विशेष शाखेतील २ असे एकूण ३३ पोलीस कर्मचारी पुणे येथील महाराष्ट्र गुप्तवार्ता अकादमी येथे १० दिवसांच्या ट्रेनिंगसाठी गेले होते. ट्रेनिंग संपवून नागपुरात परत आले त्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याला ताप व खोकला यासारखी सौम्य लक्षणे जाणवल्याने पोलीस रुग्णालयातही डॉक्टरांनी त्या पोलीस कर्मचाऱ्याला कोरोना टेस्ट करण्यास सांगितले असता त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली.

एका पोलीस कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने पुण्याला गेलेल्या इतर पोलिसांची कोरोना चाचणी करण्यात आली. पुण्याला गेलेल्या ३३ पैकी २० पोलिसांची टेस्ट करण्यात आली त्यातून आणखी काही जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबाधितांचा आकडा १२ वर पोहोचला आहे. नागपूर पोलीस दलाकडून खबरदारीचा उपाय म्हणून या सर्व कोरोना पॉझिटिव्ह पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. सोबतच उर्वरित पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी आज करण्यात येणार आहे

Leave a Reply

%d bloggers like this: