महेश सोसायटी व लायन्स क्लबच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न


पुणे:या वर्षी मागच्या वर्षीप्रमाणे मंडळ गणेशोत्सव साधेपणाने करत आहे.काही मंडळ तर ऑनलाईन दर्शन ठेवत आहे.कोरोना महामारी चे संकट दूर होव्ये म्हणून काही मंडळानी रक्त दान शिबीर ठेवले आहे. अशातच बिबवेवाडी तल्या महेश सोसायटी मंडळाने मागच्या वर्षी प्रमाने यंदा ही महेश सोसा यटी मित्र मंडळाने
मोफत नेत्र तपासणी शिबीराचा कार्यक्रम आज ठेवला होता .महेश सोसायटी व लायन्स क्लब आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबीर आज पार पडले.या शिबीरा मध्ये महेश सोसायटी व इंदिरा नगर येथील नागरिकांनी मोफत नेत्र तपासणी करून घेतली. या शिबिरामध्ये 300 नागरिकांनी मोफत तपासणी करून घेतली.
या  शिबीराचे आयोजन महेश सोसायटी मित्र मंडळ व लायन्स क्लब चे योगेश पोतदार,प्रताप शिंदे,नेहा कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमाला महेश सोसायटी मित्र मंडळाचे अध्यक्ष साई परदेशी, उपाध्यक्ष तन्मय कवडे, दर्शन गंगावणे, राहुल घुम, तुषार कवडे, प्रवीण कदम, अभिजीत पवार, युवराज चिकणे उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: