पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आमरावतीच्या प्रियकराचा बीड च्या प्रेयसीने केला खून

पुणे : राज्यभरातून विद्यार्थी पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी येत असतात, अनेक वर्षे सानिध्यात राहिल्याने  काहींचे प्रेम संबंधही निर्माण होतात.  अशाच एका लीव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या एका कपल मधील प्रेयसीने आपल्या प्रियकराचा खून केल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली. 

खून झालेल्या तरुणाचं नाव सोनल पुरुषोत्तम दवाळे (34) आहे. अमरावती येथील तिवसा तालुक्यातील घोटा गावातून  तो पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी कऱण्यासाठी आला होता. सोनल पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. मागील तीन ते चार वर्षांपासून तो हडसर भागातील फुरसुंगी येथे फ्लॅट घेऊन राहात होता. या कालावधीत त्याची बीडच्या एका तरुणीसोबत ओळख झाली. या ओळखीचं रुपांतर कालांतराने प्रेमात झालं. त्यानंतर दोघं दोन वर्षांपासून ‘लिव्ह ईन’ रिलेशनशिपमध्ये राहत होते.

दरम्यान या जोडप्यामध्ये संशयावरून वाद झाला. हा वाद सोनलच्या जीवावर बेतला. प्रेयसीने सोनलचा गळा दाबून त्याला भिंतीवर ढकलून दिलं. यात सोनलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

सोनलचा मृतदेह घरात असताना त्याच्या प्रेयसीने तो बेशुद्ध असल्याचा बनाव करत घरमालकाला बोलावलं. मात्र तो मृत असल्याचं कळताच घरमालकाने पोलिसांना कळवलं. आता शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सोनलचा मृत्यू गळा दाबल्याने आणि डोक्याला मार लागल्याने झाल्याचं समोर आलं.

या प्रकरणात पोलिसांनी आरोपी प्रेयसीला विचारपूस केली. मात्र सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरं दिली. मात्र पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता प्रेयसीने गुन्ह्याची कबुली दिली. २००८ मध्ये सोनलची सीआयएसएफसाठी निवड झाली होती.मात्र २०१० मध्ये नोकरी सोडून तो पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता.

Leave a Reply

%d bloggers like this: